After a thrilling chase, a gang of robbers arrested in Miraj 
पश्चिम महाराष्ट्र

थरारक पाठलागानंतर दरोडेखोर टोळी मिरजेत जेरबंद

शैलेश पेटकर

सांगली ः मिरजेतील शास्त्री चौकातील एका दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची घटना टळली. या टोळीतील निमजी इगलीस काळे (वय 62), परारी ऊर्फ गांगुली निमजी काळे (19), सोमनाथ निमजी काळे (20), विशाल निमजी काळे (24, सर्व रा. कोडगाव तांडा, धुपखेडा, पैठण, जि. औरगांबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सचिन निमजी काळे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जबरी चोरी, दरोडा, घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस मिरज विभागात गस्तीवर होते. त्यावेळी मिरजेतील शास्त्री चौक ते म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे ट्रेडर्स दुकानासमोर पाचजण संशयास्पदरित्या असल्याची माहिती सहायक निरीक्षक रवीराज फडणीस यांना मिळाली. 

त्यानुसार रात्री दहाच्या सुमारास पथक त्याठिकाणी गेले. त्यावेळी पाचजण तेथे आढळले व पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, शिंगाडी हातोडी, लोखंडी आरी पट्टी, रॉड, एक्‍सा ब्लेड, कोयता, मिरची पुड, मोबाईल आणि रोकड सापडली. संशयितांनी याठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यांच्यावर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यभर गुन्हे 
संशयित काळे टोळीवर राज्य विविध ठिकाणी घरफोडी, चोरी, दरोडा, टाकण्याची तयारी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी व्यक्त केले आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT