Agent arrested with police for taking bribe of Rs. Crime against three in Vita 
पश्चिम महाराष्ट्र

लाखाची लाच घेताना पोलिसासह एजंटास अटक; विट्यात तिघांवर गुन्हा

दिलीप कोळी

विटा (जि. सांगली) : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात वाढीव पोलिस कोठडी न मागण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार विवेक पांडुरंग यादव (वय 28) व खासगी एजंट अकीक फिरोज तांबोळी (वय 23, विटा) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या गुन्ह्यात विटा पोलिस ठाण्याचा सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पोपट झालटे याचाही सहभाग असून तो पसार झाला. तिघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तक्रारदार खासगी ठिकाणी दिवाणजी म्हणून काम करतात. तक्रारदार यांच्या मालकाविरोधात विटा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराच्या मालकास पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी प्रदीप झालटे व विवेक यादव यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, झालटे व यादव या दोघांनी तक्रारदाराकडे दीड लाखाची मागणी करून एक लाख रुपये आज आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विटा पोलिस ठाणे परिसरात सापळा लावला.

तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच घेताना यादव आणि खासगी एजंट तांबोळी या दोघांना अटक केली. लाच घेताना झालटे उपस्थित नव्हता. कारवाईची चाहूल लागल्यानंतर तो पसार झाला. चौकशीत झालटे, यादव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांसह खासगी एजंट तांबोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या यादव व तांबोळी यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 


पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, सलीम मकानदार, भास्कर भोरे, राधिका माने, रवींद्र धुमाळ, सीमा माने, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी कारवाई केली. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Latest Marathi News Update : गडचिरोलीत ST बस उलटली; 25 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT