mahapalika.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

नगरसेवकांचे महापालिकेत धरणे आंदोलन;महापौर,उपमहापौर, आणि सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

मिरज (सांगली ) : वार्षिक ठेकेदार काम करत नाहीत, त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे शहरातील मागासवर्गीयांच्या वस्त्यांमधील नागरी सुविधाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या निषेधार्थ नगरसेवक योगेंद्र थोरात आणि नगरसेविका सौ. पारधी यांनी आज महापालिकेत धरणे आंदोलन केले. नगरसेवक थोरात आणि नगरसेविका सौ पारधी यांच्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली.


महापालिकेने मिरज शहरातील तातडीने करावयाच्या कामांसाठी वार्षिक दर करार पद्धतीने ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात हे स्थायी समिती सदस्य असताना त्यांचे मिरजमधील या वार्षिक सेवापुरवठादाराच्या नियुक्तीसाठी सत्ताधारी गटाशी जोरदार मतभेद झाले होते. सांगलीमध्ये अशाप्रकारची ठेकेदारी पद्धत असताना मिरज शहरासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमावेत अशी मागणी करत नगरसेवक थोरात यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून अशा प्रकारची कामे तातडीने करावयाच्या कामासाठी ठेकेदार नियुक्तीचे ठराव संमत करुन घेतला.तरीही हे ठेकेदार सक्षमपणे काम करत नसल्याचा थोरात यांचा आरोप आहे. शहरातील अण्णाभाऊ साठे नगर आणि बौद्ध वसाहत या परिसरात ऐन दिवाळीत सांडपाणी साचल्याने येथील नागरिकांना सांड पाण्यातच दिवाळी साजरी करावी लागली.

वार्षिक ठेकेदाराला याची माहिती देऊनही ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. ठेकेदारांच्या या मुजोरीपणास महापालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचा नगरसेवक थोरात यांचा आरोप आहे. याच कारणासाठी नगरसेवक थोरात यांनी आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांच्या खालीच बैठक मारली आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. नगरसेवक सूर्यवंशी आणि नगरसेविका सौ पारधी यांच्या घोषणाबाजीने महापालिकेचा परिसर दणाणून गेला. अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली.ड्रेनेज पाणीपुरवठा आणि प्रशासनातील अधिकारी याठिकाणी आले आणि त्यांनी तातडीने प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली आणि कामाचे आदेश दिले त्यानंतर थोरात आणि सोनू पारधी यांनी उपोषण मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT