पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : कृषी मंत्री आले राहीबाईंच्या घरी, म्हणाले, बियाणे बँकेचे राज्यभर पोचवू

सकाळ वृत्तसेवा

अकोले : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कामाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. शासनाकडून पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे काम राज्यभर पोहचविण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
    राज्याचे कृषी मंञी दादा भुसे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बिजशाळेला भेट देवून पद्मश्री पोपेरे यांचा सत्कार केला. यावेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी.जि.प.अध्यक्ष नाशिक उदय सांगळे, नाशिक विभागीय कृषी सह संचालक पडवळ,  कृषी उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, अकोले शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ,शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी,प्रदीप हासे, नगरसेवक प्रमोद मंडलिक बायफचे जतिन साठे उपस्थित होते. या प्रसंगी ना. दादा भुसे यांनी पद्मश्री पोपेरे यांची नविन व जुनी अशा बियाणे बँकेची पाहणी केली.

भुसे पुढे म्हणाले कि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराज रयतेचे व शेतकऱ्यांचे रक्षक होते. आज महाराजांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर आपण अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना भेटून त्याची बीज बॅक पाहुन त्याचे कामाची माहिती घेण्यासाठी आलो होतो. बीजमाता पोपेरे यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम आहे. या सर्व कामाची माहिती आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे . पद्मश्री पोपेरे यांचे काम राज्यातील प्रत्येक गाव-वाडी पर्यत संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी आपले महाआघाडी सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. यावेळी भुसे यांनी पद्मश्री पोपेरे दांपत्यासह बायफचे जतिन साठे यांचा सत्कार केला

अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने .भुसे यांचा अकोले तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी, प्रदीप हासे, प्रमोद मंडलिक यांनी सत्कार केला.
अकोले तालुक्याने पद्मश्री व महाराष्ट्र केसरी असा दुहेरी सन्मान मिळवला आहे. त्यामुळे अकोले तालुक्याच्या विकासासाठी काय करणार हे सांगण्यापेक्षा कृतीतुनच आपले सरकार दाखवून देईल असा विश्वास कार्यकर्त्याना ना. दादा भुसे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर आमदार निवासात राहण्याची वेळ, सव्वा वर्षापासून अधिकृत निवासस्थानाच्या प्रतीक्षेत

Latest Marathi News Live Update : वईतील आरे कॉलनीत बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीपोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

SCROLL FOR NEXT