ahmednagar frist in drama compition
ahmednagar frist in drama compition 
पश्चिम महाराष्ट्र

राज्य बालनाट्य स्पर्धेत नगरचा डंका 

सकाळ वृत्तसेवा

नगर : राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रात नगरच्या नाट्य आराधनाच्या "वानरायण' या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली आहे. नाशिक केंद्रातून एकूण 44 बालनाटके सादर झाली. त्यात नगर जिल्ह्यातील नाटकांना 12 पारितोषिके मिळाली. एकट्या "वानरायण'च्या झोळीत पाच पारितोषिके पडली आहेत. हा निकाल काल (शुक्रवारी) उशिरा जाहीर झाला. 
"वानरायण'चे दिग्दर्शक आणि "नाट्य आराधना'चे अध्यक्ष अनंत जोशी म्हणाले, की "वानरायण'च्या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने नगरला प्रथमच राज्य बालनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला, हे नगरच्या रंगभूमीसाठी अभिमानास्पद आहे. सर्व ज्येष्ठ रंगकर्मींचे मार्गदर्शन, नाट्य आराधनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश मिळाले. 


"वानरायण'च्या या यशाबद्दल नाट्य आराधनातर्फे आंबेडकर स्मारक येथे नटराजांचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ नाट्यलेखक वामन पतके, ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजन, नाट्यकर्मी रघुनाथ आंबेडकर, अनंत जोशी, राजा देशमुख, संजय जोशी, संतोष दुशी, गिरिजा दुशी, कस्तुरी दुशी, सागर शिंदे आदी उपस्थित होते. 

नगर जिल्ह्याला मिळालेली पारितोषिके 
 सांघिक - द्वितीय (वानरायण)  दिग्दर्शन - द्वितीय - श्रिया देशमुख (कट्टी बट्टी शिट्टी), तृतीय - अनंत जोशी (वानरायण)  उत्कृष्ट अभिनय - रौप्यपदक - स्वानंदी भारताल (पिंटी)  प्रकाश योजना - प्रथम - तेजस अतितकर (वानरायण)  नेपथ्य - प्रथम - लक्ष्मीकांत देशमुख (वानरायण), द्वितीय - दीपक अकोलकर (पिंटी), 
 अभिनय - गुणवत्ता प्रमाणपत्र - हर्षवर्धन महाडीक (वानरायण), सर्वज्ञा कराळे (चिल्ड्रन ऑफ हेवन), कांचन लंधे (ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा), कृतार्थ गुणावरे (घर देता का घर), निषाद भणगे (मोमोज). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या चार विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT