In Ahmednagar the total number of sari patients was forty-two 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये सारी रुग्णांची संख्या झाली ४२

सकाळ वृत्तसेवा

नगर-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.  

जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जिल्हा अगोदरच कोरोनाच्या भयंकर आजाराने त्रस्त आहे.त्यात पुन्हा सारीची साथ सुरू आहे. ज्यांना लागण झाली आहे, त्यांचे कुटुंबीय तर तणावाखाली आहेच परंतु इतरांनाही त्याचा फटका बसला आहे. तब्बल ४५ लाख लोकसंख्या भीतीच्या सावटाखाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी २७पर्यंत गेली आहे. पहिले तीन रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. नंतरच्या टप्प्यात तबलिगींमुळे जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढली. जामखेड, संगमनेर, मुकुंदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात कोरोनाचे पेशंट आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT