Ahmednagar was not afraid of Corona 
पश्चिम महाराष्ट्र

यांना कोरोना म्हंजे मज्जाच वाटतीय... बेफिकिरांमुळे नगरकर वेठीस

अमित आवारी

नगर ः "कोरोनाला आपण काय घाबरत नाय... अबे, कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही.. आपल्या कॉलनीत अजून कोरोना आलेला नाही. त्यामुळे मजेत जगा. सुट्यांचा आनंद घ्या...' असे म्हणत शहरासह ग्रामीण भागातील काही जण खुशाल घोळक्‍याने मोकाट फिरत आहेत. मौजमजा सुरू आहे. पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या विनंत्यांना केराची टोपली दाखवीत, स्वत:सह दुसऱ्यांच्याही आयुष्याशी खेळत आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. महसूल, आरोग्य, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था कोरोनाविरोधात लढत आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, इतरांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. मात्र, काही जणांना अजूनही या आजाराचे गांभीर्य दिसत नाही. "आला असेल कोरोना, मला काय त्याचे,' या आविर्भावात चौकाचौकांत गप्पांचे फड रंगत आहेत. प्रशासनाने घरात बसण्यासाठी सुटी दिली खरी; पण ही मंडळी मौजमजा करण्यात दंग आहेत. 

पोलिसांचे वाहन दिसताच या मंडळींची पळापळ सुरू होते. वाहने गेली, की पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती आहे. काही टारगट मुद्दाम मोबाईलवर पोलिस सायरनचा आवाज काढत दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना कोणी समजावून सांगण्यास गेल्यास, "कोरोनाला घाबरू नका,' असा उफराटा सल्ला देत आहेत. 

शहरातील कामगार गावी परतले आहेत. पारनेर, श्रीगोंदे, कर्जत तालुक्‍यांत त्यांची संख्या मोठी आहे. त्यांना "होम क्वारंटाईन' केलेले असतानाही, गावातील मित्रमंडळी, नातेवाइकांच्या गाठीभेटी घेत ते फिरत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचेही ते ऐकत नाहीत. काही कामगार ग्रामीण भागात पार्ट्या करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. 

शहरवासीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कल्पना दिली जात आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले जात आहेत. शिवाय, महापालिकेने खासगी रिक्षांद्वारेही जनजागृती केली आहे. मात्र, अजूनही नागरिक गर्दी करताना दिसत आहे. नागरिकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे. 
- श्रीकांत मायकलवार, आयुक्त, महापालिका 
.
नगर शहरात रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या सुमारे एक हजार जणांविरुद्ध कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत, तरीही लोक रस्त्यावर फिरताना आढळून येतात. यापुढे अधिक कडक कारवाई करण्यात येईल. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक शहर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT