AIR POLLUTION 
पश्चिम महाराष्ट्र

जरा जपून...'या' शहरातील हवा होतेय प्रदूषित 

तात्या लांडगे

सोलापूर : बांधकाम करताना उडणाऱ्या धुलीकणामुळे वातावरण प्रदूषित होऊ लागल्याने मुंबई, पुणे यासारंख्या महानगरांप्रमाणे आता सोलापूर महापालिकेनेही बांधकामाच्या सभोवताली बांधकाम व्यावसायिकांना ग्रीन नेट (हिरव्या रंगाची जाळी) लावणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. हवा प्रदूषण टाळण्यासाठी आता बांधकाम परवाना अथवा पाडकामाचा परवाना देताना ग्रीन नेटची अट टाकून दिला जात आहे. किमान 100 मिलिग्रॅम घनमीटरपर्यंत हवा शुध्द असायला हवी मात्र, सोलापुरातील हवा 70 मिलिग्रॅम घनमीटरची पातळी ओलांडत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी सांगितले. 


शहरातील रस्त्यांवरील दुभाजकांवरील माती, रस्त्यालगत साचलेली धूळ, बांधकाम करताना महापालिकेच्या नियमांकडे बांधकाम व्यावसायिकांचा कानाडोळा, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंगची व्यवस्था या प्रमुख कारणांमुळे शहरातील हवा धोक्‍याची पातळी ओलांडताना दिसत आहे. याबाबतीत महापालिकेला सातत्याने सूचना करुनही रस्त्यांवरील धूळ अथवा वाहनांद्वारे होणारे प्रदूषण थांबलेले दिसत नाही, असेही श्री. भोसले म्हणाले. बांधकाम करताना अथवा जुन्या बांधकामाचे पाडकाम करताना ग्रीन नेट लावणे अनिवार्य असतानाही अनेक ठिकाणी ते दिसतच नाही. तरीही महापालिका काहीच कारवाई करीत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 



ठळक बाबी... 

  • रस्त्यालगतची धुळ, बांधकामावेळी उडणाऱ्या धुलिकरणाने श्‍वसनाच्या विकारात वाढ 
  • हवा शुध्दतेसाठी 100 मिलीग्रॅम घनमीटरपर्यंत नियंत्रण असावे 
  • सोलापुरात 70 मिलिग्रॅम घनमीटर हवा दुषित : महापालिकेचा कानाडोळा 
  • शहर वाहतूक पोलिस अन्‌ आरटीओकडे नाही ठोस वाहतूक आराखडा 
  • पार्किंगची सोय नाही : वाहतूक कोंडीमुळे शहरात वाढतेय हवा प्रदूषण 


'पीयुसी'ची पडताळणी नाहीच 
सोलापूर शहरात सात लाख 86 हजार 789 दुचाकी तर 18 हजार 809 ऍटोरिक्षा आहेत. तसेच अन्य वाहनांची संख्या सुमारे पावणेदोन लाखांपर्यंत आहे. प्रत्येक वाहनांकडे पियुसी (पोल्यूशन कंट्रोल युनिट) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. दर सहा महिन्यांनी संबंधित वाहनधारकांनी ते प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे मात्र, बहूतांश वाहनांकडे ते प्रमाणपत्रच नसल्याचे चित्र आहे. तरीही शहर वाहतूक पोलिस असो की आरटीओ अधिकाऱ्यांकडून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. 

हवा प्रदूषण टाळण्यासाठी... 

  • धुळीचे प्रमाण कमी होण्यासाठी रस्त्याच्या कडेची धुळ सातत्याने स्वच्छ करावी 
  • बांधकाम अथवा रस्त्यांची कामे करताना त्याठिकाणी सातत्याने पाण्याचा सडा मारावा 
  • वाहतूक सुरळीत राहावी, एकाच ठिकाणी अधिक वेळ वाहने थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी 
  • शहरात महापालिकेच्या मालकीची पार्किंगची सोय मुबलक असावी : वाहनांची वेळ निश्‍चित करावी 
  • आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांनी वाहनांकडील 'पियुसी'ची सातत्याने पडताळणी करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT