Ajit Pawar and Sharad Pawar sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sakal Survey : मनात ‘साहेब’, कृतीत ‘दादा’

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य आहे.

निखील पंडितराव

Sakal Survey - पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख दृढ आहे; मात्र या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा अजित पवारांबरोबर गेल्याचे सकृतदर्शनी दिसत असले तरी कार्यकर्त्यांच्या मनात ‘साहेब’ आणि कृतीमध्ये ‘दादा’ असल्याचे जाणवते.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य आहे. अजित पवार यांनी उचललेल्या पावलामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मागे नेहमीच ठामपणे उभा राहिलेल्या आणि पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यातील पक्षाचे दोन्हीही आमदार तसेच जिल्हाध्यक्षांसह जिल्हा बँक, ‘गोकुळ’चे संचालकांनीही दादांचे नेतृत्‍व स्वीकारले आहे.

माजी आमदार के. पी. पाटील यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत नेहमीच असलेले व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार यांच्यासह काही जुने कार्यकर्ते एकत्र येऊन पक्षाची मोट पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील पक्ष मात्र अभेद्य असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात विधानसभेचे तीन व परिषदेचा एक असे चार आमदार आहेत आणि सध्या ते सर्व शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्षही शरद पवार यांच्यासोबतच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT