The Akolekars gave 11 lakhs to the Maharashtra Kesari Sadgir 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी सदगीरला गावकऱ्यांनी दिले अकरा लाख 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : अकोले तालुक्‍याने जो सन्मान व मदत केली, त्याचे चीज करून 2024ला ऑलिम्पिक व हिंद केसरी मिळविण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र केसरी गदा गुरूंना अर्पण करतो, असे भावनिक उद्‌गार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने काढले. 

महाराष्ट्र केसरी किताब मिळविल्यानंतर प्रथमच अकोल्यात आलेल्या हर्षवर्धन सदगीर याचा बसस्थानक परिसरात नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तो बोलत होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. 
माजी आमदार वैभव पिचड, बीजमाता राहीबाई पोपेरे, वस्ताद काका पवार, गोरक्षनाथ बलकवडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, महादेव पठारे, हर्षवर्धनचे वडील मुकेश सदगीर, आई ठकूबाई सदगीर, आजोबा किसन सदगीर, कोंडाजी ढोन्नर, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, गुलाब बर्डे उपस्थित होते. 

हर्षवर्धन म्हणाला, ""कुस्ती स्पर्धेत यश मिळाले तेव्हा, तसेच 2014ला कांस्यपदक मिळाले, तेव्हा अकोलेकरांनी माझा सत्कार केला. वेळोवेळी मदत केली. महाराष्ट्र केसरी जिंकेल की नाही, याबाबत मला विश्वास नव्हता. मात्र, गुरू काका पवार यांना पूर्ण विश्वास होता. त्यानंतर मी मनापासून ठरविले की, त्यांचा विश्वास सार्थकी लावायचा महाराष्ट्र केसरी गदा मिळवायचीच!'' 

हरियानासारखे पाठबळ हवे 
माजी मंत्री पिचड म्हणाले, ""क्रीडा क्षेत्रात हरियानातील खेळाडू चमकतात. तेथे खेळाला प्रोत्साहन दिले जाते, तसे आपल्याकडे दिले जात नाही. सरकारने खेळाला प्राधान्य देऊन क्रीडा क्षेत्राला आर्थिक मदत केल्यास दर्जेदार खेळाडू निर्माण होतील.'' 


नगरसेवक प्रकाश नाईकवाडी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक ऍड. वसंत मनकर यांनी केले. सूत्रसंचालन नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले. राजेंद्र सदगीर यांनी आभार मानले. 

अकरा लाखांचे बक्षीस 
अकोल्यातील महात्मा फुले चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याची मिरवणूक काढण्यात आली. अकोलेकरांतर्फे 11 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT