येळावी (जि. सांगली) ः "कोरोनो' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन व संचारबंदी आहे. शेतकऱ्यासह नाभिक, सुतार, पुजाऱ्यांसह बारा बलुतेदारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. जणू सर्वजण "कोरोना' च्या संचारबंदीत लॉकडाऊन झाले.
वास्तविक "कोरोना'च्या महामारीच्या काळात समाजातील सर्वच घटकांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या बळीराजाचे मोठ्या प्रमाणात अगोदरच नुकसान झाले आहे. पोशिंद्यासह व समाजातील सर्व घटकास मदत करणाऱ्या बारा बलुतेदारांचेही सर्व व्यवसाय सध्या बंद पडले. या लॉकडाऊन संकटाची सुरवातच नाभिक या बलुतेदारापासून होते. त्यांचा सलून व्यवसाय हा ग्राहकाच्या चेहऱ्याशी व त्यांच्या केसाशी थेठ संपर्क येत असल्याने कोरोना संसर्गाची जास्त शक्यता निर्माण होते. परिणामी या व्यवसायिकांनी त्यांच्या संघटनेने दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच त्यांनी आपली सलून दुकाने बंद केली होती. सध्या दुसरा लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे एप्रिल मे महिन्यात सुरु होणाऱ्या लग्न सराईतील लगीन चेहरा कमाई बुडणार आहे. या "कोरोना' मुळे दुकाने बंद राहणार असल्याने या सर्व व्यावसायिकांची आर्थिक गणिते बिघडणार आहेत.
पंतप्रधानांनी नऊ एप्रिलला मेणबत्ती, पणत्या लावण्याचे आवाहन केल्यामुळे कुंभारांनी तयार केलेल्या पणत्यांना थोडाफार ग्राहक मिळाला. लोकांना थोडाफार आर्थिक लाभ झाला. परंतू नंतर लग्न सराईतील फायदा बुडाला.
बारा बलुतेदाराचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुतार समाजाचे कंबरडेच मोडले आहे. अगोदरच यांत्रिक शेतीमुळे शेती अवजारांची कामे नाहीशी झाली. जास्तीत जास्त फर्निचर व्यवासायाकाकडे वळलेत. सध्या फर्निचर साहित्य दुकानेही बंद आहेत. नाभिक समाजाचीही तीच स्थिती आहे. त्यांच्यावरही मोठे आर्थिक संकट आले. यांत्रिक पद्धतीने द्रोण पत्रावळी व्यवसायाने गुरव समाजाचा पारंपारिक व्यवसाय बंद पडला. त्यांची उपजीविका ज्या मंदिरातील पूजेअर्चेवरच व्हायची ती देशातील सर्वच मंदिरे, यात्रा, जत्रा लॉकडाऊनमुळे बंद राहिल्याने गुरव, पुजाऱ्यांचीही वाताहत झाली.
परिट समाजाचीही धुलाई दुकानेही बंद झाल्याने त्यांच्यावरही संकट आले. फुल व्यवसाय बंद झालेल्याने माळी, त्याचप्रमाणे कोळी, कोष्टी, रामोशी, शिंपी इत्यादी बारा बलुतेदारांची या लॉकडाऊन काळात ससेहोलपट सुरू आहे. त्या सर्वांचे व्यवहार थांबलेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.