fast food.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"पार्सल' सेवेसाठी परवानगी द्या, अन्यथा संस्था "क्वारंटाईन' करा : या विक्रेत्यांची गांधिगिरी 

सकाळवृत्तसेवा

सांगली- कोविड-19 साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' मुळे फास्टफुड हातगाडे विक्रेत्यांची अडीच महिन्यापासून उपासमार सुरू आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थ पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्या, अन्यथा आम्हाला संस्थात्मक क्वारंटाईन करा अशी मागणी करत सांगली शहर (फास्टफुड) विक्रेते हातगाडी असोसिएशनने आज गांधिगिरी मार्गाने आंदोलन केले. शहरातील प्रमुख चौकाचौकात डोक्‍यावर पांढरी टोपी आणि तोंडावर काळा मास्क लावून फलक घेऊन शेकडो विक्रेते आंदोलनात सहभागी झाले. 


"कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन केल्यापासून हजारो खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचे व्यवसाय आजअखेर बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे तसेच इतर कोणता व्यवसाय करण्यात अडचणी असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शासनाकडूनही कोणतीच आर्थिक मदत त्यांना आली नाही. जिल्ह्यातील दोन ते तीन हजार फेरीवाले कोरोनाच्या संकटात हतबल झाले आहेत. लॉकडाउन शिथील केल्यानंतर अनेक व्यवसायांना मोकळीक दिली आहे. हॉटेल व नाष्टा सेंटरमध्ये पार्सलची सुविधा सुरू आहे. परंतू फास्टफुड विक्रेत्यांना व्यवसायासाठी कोणतीच सवलत दिली नाही. आतातरी आम्हाला पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्या अशी मागणी करत आज शेकडो विक्रेत्यांनी शहरातील चौकाचौकात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत गांधिगिरी आंदोलन केले. 


"व्यवसाय करण्याची संधी द्या अन्यथा संस्थात्मक क्वारंटाईन करा', "मला कोणी न्याय देईल काय', "मी पण एक भारतीयच' असे फलक घेऊन शेकडो विक्रेते डोक्‍यावर पांढरी टोपी, तोंडावर काळा मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग ठेवून चौकाचौकात थांबले होते. आंदोलनानंतर संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले, पदाधिकारी रघु सरगर, अशोक सरगर, अनिल धुमाळे, अभिजीत तवटे, अस्लम शेख आदींच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 
राज्यस्तरावर निर्णय हवा- 
फास्टफुड विक्रेत्यांचा पार्सल सेवेचा प्रश्‍न जिल्हास्तरावरचा नसून राज्यस्तरावरील आहे. त्यामुळे जिल्ह्यापुरता निर्णय घेता येणार नाही. शासनस्तरावर याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT