Along With BJP Ex Member Sevan Tadipar In Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

धाबे दणाणले ! भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासह सात जण तडीपार 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथील भाजपचे माजी पदाधिकारी प्रवीण बाळासो माने (वय 29) याच्यासह सात जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय सोपान कोळेकर (वय 27), अनिल बापुसो गावडे (22), सचिन सर्जेराव रास्कर (27), काशिनाथ विठ्ठल ढोले (40), शोएब सलीम सनदी (20) आणि उमेश सर्जेराव रास्कर (27, सर्व रा. आष्टा) अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत. टोळीविरोधात 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. 

अधिक माहिती अशी, की प्रवीण माने हा भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे. तो या टोळीचा म्होरक्‍या आहे. तो आष्टा आणि जवळच्या खेडगावात मटका-जुगाराचा व्यवसायही चालवतो. स्वतः मटका बुकी मालक असून त्याच्याकडे इतर लोक एजंट म्हणून काम करतात. यासह त्याने टोळी तयार केली होती. सन 2011 पासून त्याची टोळी आष्टा व इस्लामपूर परिसरात कार्यरत होती. बेकायदेशीर जमाव जमवून दमदाटी व मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध मटका-जुगार व्यवसाय असा 24 गंभीर गुन्हे टोळीविरोधात दाखल आहेत. 

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीचा प्रस्ताव

टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. टोळीतील गुन्हेगारांना सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 नुसार ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT