सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा सांगलीवाडीकडे जाणारा आयर्विन पुलासह शहरासह उपनगरातील 40 गल्ल्यांना पोलिस प्रशासनाने टाळे लावले. याठिकाणी पोलिसांची करडी नजर असून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने सांगलीवाडी, हनुमाननगर, संजयनगर, शंभरफुटी रस्ता, शामरावनगर परिसरातील उपनगरांचा यात समावेश आहे.
कोरोना'मुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद केली आहे. जिल्ह्याच्या सीमादेखील रोखण्यात आल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या हुल्लडबाज तरुणांविरुद्ध जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी मोहीम उघडली आहे.
आतापर्यंत हजारो शेकडो जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. तरी देखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांनी अडवले तर खोटी कारणे देऊन सुटका करून घेतात.
रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस गल्ल्यातील रस्ते रोखण्याची मोहीम हाती घेतली आहे. काल खणभाग आणि नळभागातील सर्व गल्ल्यांत प्रवेश होणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले. तसेच मारुती रस्ता, गावभाग अंकली रस्ता, टिळक चौकातून गावभागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्हा पोलिस व महापालिका प्रशासनाने 16-17 मार्चपासूनच गर्दीद्वारे संक्रमण टाळण्यासाठी अनेक व्यवसाय बंद केले होते.
त्यामुळे गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर तसे लॉकडाऊन आहे. पोलिसांचाही गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर रात्र न् दिवस खडा पहारा आहे. सोबतच नागरी सुविधांची गैरसोय होऊ नये यासाठीही दूध, किराणा, भाजपाला, औषधांसह अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. त्या घरपोहोच देण्याची व्यवस्थाही केली.
आज यासंदर्भात खबरदारी म्हणून शहरासह उपनगरातही नाकाबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत सांगलीवाडीतून होणारी शहरात वाहतूक रोखण्यासाठी आयर्विन पुलाचा मार्ग बंद करण्यात आला. यासाठी टिळक चौकाजवळच बॅराकेटस् लावून रस्ता सील केला. बायपास रस्त्यामार्गे शिवशंभो चौकातून शहरात येणारी वाहतूकही बंद करण्यात आली. यामार्गे सर्वच रस्ते बंद केले. सांगलीतील नवीन वसाहत, हनुमाननगर, संजयनगरसह अनेक उपनगरांच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांनाही बॅरीकेटस् लावून बंद करण्यात आले. त्यामुळे सांगली शहर आता पूर्ण लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. उद्या (ता.19) आणखी काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे समजते आहे.
गरज भासल्यास आणखी रस्ते, उपनगरे बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सर्व रस्ते बंद करण्यात येत आहेत. उद्या गरज भासल्यास आणखी काही रस्ते, उपनगरे बंद केले जातील. नागरिकांनी रस्त्यावर उतरू नये. उतरल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- अशोक विरकर, पोलिस उपअधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.