Accident sakal
पश्चिम महाराष्ट्र

मानमोडीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात कुपवाडचे दोघे ठार

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड : मानमोडी (ता. मिरज) हद्दीतील तासगाव - मिरज(tasgaon-miraj road) रस्त्यावरील स्वयंभू गणपती मंदिराच्या समोर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सचिन शामराव कांबळे (वय ३३, रा. हनुमानगर कुपवाड) दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर अपघातातील दुसरे जखमी सोनीत शांतीनाथ सिद्धनाळे (वय ३५ रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) यांचा सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिसात झाली आहे.(accident news in kupwad)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत सचिन कांबळे व त्याचा मित्र सोनीत सिद्धनाळे हे दोघेजण बुधवारी सायंकाळी दुचाकीवरुन (वाहन क्रमांक एमएच १० वाय ४८७१) तासगाव - मिरज रस्त्यावरून कुपवाडच्या दिशेने येत होते. मानमोडी नजिकच्या स्वयंभू गणपती मंदिरासमोर येताच भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. अपघातात सचिन कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. जखमी सोनीत

सिध्दनाळे यांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात(sangli hospital) दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू (death)झाला. घटनेची नोंद कुपवाड पोलिसात (police)झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT