Ancient sculpture Found in Basarikatti Village  esakal
पश्चिम महाराष्ट्र

बसरीकट्टीत आढळले श्रीरामचे प्राचीन शिल्प! मंदिर उभारण्यासाठी गावकऱ्यांच्या हालचाली, काय आहे खासियत?

बसरीकट्टी (ता. बेळगाव) गावात प्राचीन शिल्प (Ancient Sculpture) आढळून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण जातानाचे हे शिल्प असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी केला आहे.

बेळगाव : बसरीकट्टी (ता. बेळगाव) गावात प्राचीन शिल्प (Ancient Sculpture) आढळून आले आहे. पाच फूट उंच व तीन फूट रुंद असलेले हे शिल्प पुरातन असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गत अनेक वर्षांपासून थळ देवस्थान म्हणून या दगडाची (देवाची) पूजा केली जात होती. मात्र, खोदाई केल्यानंतर पूर्ण शिल्प बाहेर आले आहे. या ठिकाणी छोटे मंदिर बांधण्याचा विचारही ग्रामस्थांनी चालविला आहे.

अयोध्येत श्रीराम (Ayodhya Ram Temple) जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी उत्साहात करण्यात आला. त्याचदिवशी या देवस्थानाची स्वच्छता करण्यात आली. त्यादिवशी हे शिल्प ग्रामस्थांच्या नजरेस आले. त्यानंतर विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. या शिल्पाच्या अग्रभागी हातात धनुष्यबाण घेतलेला योध्दा असून, मागे सैन्य आणि घोडेस्वार आहेत. सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण जातानाचे हे शिल्प असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी केला आहे. या शिल्पावर चंद्र व सूर्यही कोरण्यात आले आहेत.

गावात आठहून अधिक थळ देवस्थान आहेत. लक्ष्मी यात्रेनिमित्त परिसराची स्वच्छता केली आहे. श्रीरामाचे देवस्थान समजून एका दगडाची पूजा केली जात होती. तेथील स्वच्छता करताना पूर्ण शिल्प बाहेर आले असून, त्याची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. हे जुने शिल्प आहे. गावकऱ्यांशी चर्चा करून छोटेखानी मंदिर बांधण्याचा विचार आहे.

-विक्रम देसाई, कार्याध्यक्ष, लक्ष्मी यात्रा कमिटी

१३ फेब्रुवारीपासून लक्ष्मी यात्रा

बसरीकट्टीत १३ फेब्रुवारीपासून लक्ष्मी यात्रा होणार आहे. यानिमित्त गावातील थळ देवस्थानांची स्वच्छता करून पूजा अर्चा केली जात आहे. गावात आठहून अधिक थळ देवस्थाने आहेत. सर्वच देवांची पूजा करण्यात आली आहे. शिवाजी नगरात हे शिल्प होते. मात्र, जुने शिल्प व धार्मिक भावना असल्याने ते बाहेर काढण्यात आले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी स्वच्छता करताना हे शिल्प बाहेर काढण्यात आले. खोदाई केल्यानंतर शिल्पाचा आकार व त्यावरील चित्रेही लक्षात आली. हे शिल्प पुरातन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT