झरे (सांगली) ः सकाळची वेळ पंढरपूर कराड म्हामर्गावरून डोक्यावर पत्र्याची पेटी घेऊन पायपीट करीत होता.. चेहरा सुकलेला, भुकेने व्यकुल झालेला, तहानलेला, उन्हाने घामजलेला, घश्याला कोरड पडली अशा अवस्थेत वाटसरू पायपीट सुरू होती. तब्बल चार दिवसापासून तो आपला सर्व संसार डोक्यावर घेवून लातूर पासून पायपीठ करीत होता.
पोलिसांनी पंढरपूर कराड महामार्गवर त्याला आडवले.. सुनील रामराव सूरवते असे नाव सांगितले, खत्रिसाठी ओळखपत्र मागितले त्यांनीही ओळखपत्र दाखविले त्याचावर्ती तो हरिजनवाडा अनदुर गावचा. उस्मानाबाद येथील रहिवासी होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो लातूरमध्ये हॉटेलमध्ये काम करून आपली उपजीविका कशी बशी भागवत होता. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्याने हॉटेल व्यवसाय बंद झाला.
त्यामुळे राहायचं कुठं खायचं काय असा गंभीर प्रश्न पडला होता. कराड येथे त्याची बहिण व भाऊ राहात आहेत. त्यामुळे सुनीलने त्यांच्या कडे जाण्याचा निर्णय घेतला. पण जायचं कसं हा गंभीर प्रश्न होता. वाहन कुठेही चालू नव्हते. त्यामुळे जायाचे कसे हा प्रश्न होता. त्यामुळे त्याने आपला सर्व संसार पत्र्याच्या पेटीत टाकला.
अन् पेटी डोक्यावर घेवून कराडच्या दिशेने चालूृ लागला. तब्बल चार दिवस सुनिल चालतच होता. हे दृश्य पाहून पोलिसांनी त्यांना अडवले त्याची विचारपूस केली, व एका वाहनांमधून त्याला पंढरपूरला पाठवले. पंढरपूर मधून चार दिवसापासून त्याची पायपीट सुरू आहे. महामार्गावरील कोणताही वाहन वाला किंवा दुचाकी वाला वाहन उभा करत नाही. त्यामुळे चालतच कराड ला जायचं असं त्यांनी ठरवलं. पंढरपूर मधून निघून चार झाले पायपीट सुरू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तो कराडमध्ये पोहोचेल अशी त्याला अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.