download (3).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अन्‌ गुलाब बागेतच कोमजला 

रवींद्र माने

तासगाव, : तासगावातून मुंबईच्या मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये रोज 600 क्रेट गुलाब, तितकाच झेंडू पाठवला जातो. रोज पाच ते सात लाखांची फुले पाच ट्रकमधून पाठवली जात. तेथून ही फुले गुजरातमध्ये जातात. 800 ते 1000 छोटे शेतकरी फुलशेती करीत आहेत. शिवाय गुलछडी, निशिगंध, जरबेरासारखी परदेशी फुले उत्पादन करणारे शेतकरी वेगळेच! ही उलाढाल 19 मार्च पासून पूर्णपणे बंद आहे. 

तेरा दिवसांत उत्पादन तर नाहीच. भविष्यात पुन्हा बाजारपेठ सुरू होईल या आशेवर ही फुलशेती जगवण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. एक एकर गुलाब जगवण्यासाठी महिन्याला 50 हजारहून अधिक खर्च करावा लागतो. त्यावरून फुल उत्पादकांच्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो. अनेकांनी झेंडू, गुलाबाचे प्लॉट सोडून दिलेत. 

ऐन हंगामात तोटा 

गुढी पाडव्यासाठी अनेकांनी झेंडू तयार केला होता. तो पाडवा गेला. आठ एप्रिलरोजी मुस्लिमांच्या बडी रातसाठी गुलाब तयार केला जातो. दोन्ही हंगाम वाया गेलेत. या काळात मागणी आणि दरही वाढलेले असतात. 

कोट 

""गुलाब, झेंडू फुलशेती जगवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे. भविष्यातील उत्पन्नाची हमी नाही. आशेवर काम सुरू आहे. निम्म्या शेतकऱ्यांनी गुलाब बागा सोडून दिल्या आहेत. त्यांना पुन्हा थेट ऑगस्टमध्ये उत्पादन सुरू होईल.'' 
-उल्हास मिरजकर, गुलाब उत्पादक व तज्ञ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT