... And the villagers threw away onions and potatoes 
पश्चिम महाराष्ट्र

...अन्‌ ग्रामस्थांनी कांदे-बटाटे फेकले उकिरड्यात

शांताराम पाटील

इस्लामपूर : कोरोना व त्यासंदर्भात अफवांचे पीक आता ग्रामीण भागात उठले आहे. या अफवेमुळेच इस्लामपूरच्या एका "क्‍वारंटाईन' केलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या कराड तालुक्‍यातील एका कांदा-बटाटा व्यापाऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांनी कालवडे (ता. कराड) येथे विकलेले कांदे-बटाटे लोकांनी उकिरड्यात फेकून दिले. या घटनेने कालवडे व बेलवडे (ता. कराड) येथील लोकांत भीतीचे वातावरण आहे.

इस्लामपूरच्या एका कुटुंबाला शासनाने होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, यातील एकाने हा सल्ला न ऐकता समाजात फिरत लोकांशी संपर्क वाढवला, भोजन दिले. यामुळे अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले. कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यावर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेत, अनेकांना होम क्‍वारंटाईन केले. काहींना विलगीकरण कक्षात ठेवले. या सर्व घडामोडीनंतर तर अनेक ठिकाणी अफवांचे पीक पसरले आहे. अशीच एक अफवा कराड तालुक्‍यातील कालवडे येथे जाऊन पोहचली. 

त्याचे झाले असे, बेलवडे येथील एका कांदा - बटाटा व्यापाऱ्याचे इस्लामपूर येथील इस्लामपुरातील कोरोगाग्रस्त कुटुंबीयांशी नाते आहे. तो व्यापारी त्यांना भेटायला गेला होता, अशी चर्चा बेलवडे येथे चालू झाली. 4-5 दिवसांपूर्वी व्यापाऱ्याने आपल्या रिक्षातून त्या परिसरात कांदा-बटाटा आणून विकला होता. मात्र, त्या व्यापाऱ्याच्या इस्लामपूर कनेक्‍शनची चर्चा सुरू झाली आणि ही अफवा कालवडे व बेलवडे परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

याची खातरजमा न करताच अनेकांनी त्या व्यापाऱ्याकडून खरेदी केलेले कांदे-बटाटे कोरोनाच्या भीतीने रस्त्यावर व उकिरड्यात फेकून दिले. काहींनी तर आपण ते खाल्ले म्हणून डॉक्‍टरांचा सल्ला घेतला. मात्र, तो व्यापारी खरोखरच इस्लामपूर येथे गेला होता का? याची खातरजमा मात्र कोणी केली नाही. या घटनेमुळे आता कालवडे येथे कोणीकोणी कांदा-बटाटा खाल्ला, कोणी नाही याची चर्चा मात्र सुरू आहे. 

कांदे-बटाटे यापासून कोरोना होत नाही

कोणताही भाजीपाला किंवा कांदे-बटाटे यापासून कोरोना होत नाही. अफवांवर विश्‍वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये. 
- नारायण देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT