schools esakal
पश्चिम महाराष्ट्र

निर्णय झाला; आता अंगणवाड्यातील किलबिलाटही सुरु होणार

मिलिंद देसाई

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी केंद्रांमध्ये परतणार आहेत.

बेळगाव : अनेक महिन्यानंतर अंगणवाडीमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकावयास मिळणार असून सरकारने 8 नोव्हेंबरपासून अंगणवाडी केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी केंद्रांमध्ये परतणार आहेत.

कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर महिला व बालकल्याण खात्याने अंगणवाडी केंद्रे बंद केली होती. मात्र अंगणवाडी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोना काळात सर्वाधिक काम करावे आहे. दररोज कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये येऊन विविध प्रकारच्या सरकारी कामांकडे लक्ष द्यावे लागत होते. मात्र विद्यार्थी अंगणवाडी केंद्रामध्ये येत नसल्याने केंद्रांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहावयास मिळत होता.

तब्बल अठरा महिने विद्यार्थी अंगणवाडी केंद्रापासून दूर होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे धडे देण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू केल्यानंतर सरकारने अंगणवाडी केंद्रे ही विद्यार्थ्यांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थी अंगणवाडी केंद्रांमध्ये परतणार आहेत. मात्र अंगणवाडी केंद्र सुरू करताना कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार असून केंद्र सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निर्जंतुकीकरण व इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

8 नोव्हेंबरपासून मुलांसाठी अंगणवाडी केंद्रे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु कोरोना काळातही कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले अंगणवाडी केंद्रात आल्यानंतर त्यांना विविध प्रकारची माहिती देणार आहोत.

- सरीता पेडणेकर, अंगणवाडी सेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT