anganwadi sevika
anganwadi sevika 
पश्चिम महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना हवीय पेन्शन अन्‌ टॅब 

प्रमोद बोडके

सोलापूर : महाविकास आघाडीच्या सरकारने किमान-समान कार्यक्रमाच्या माध्ययमातून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मानधनवाढ आपल्याला घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकांना सध्या असलेले मोबाईल निकृष्ट आहेत. मोबाईल नकोत तर टॅब द्या. सेविकांना आता सेवा समाप्ती वेतन मिळते. सेवा समाप्ती वेतन नको तर पेन्शन द्या, अशी मागणी महाराष्ट्र कामगार महासंघाचे नेते एम. पाटील यांनी केली. या मागणीसाठी येत्या काळात आपल्याला संघर्ष करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सोलापूर शाखेच्या वतीने आज डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 
हेही वाचा : उपळाई बुद्रकच्या शिंदे बंधुचे सातासमुद्रापार पाऊल 
यावेळी कामगार नेते रा. गो. म्हेत्रस, सूर्यमणी गायकवाड, सरला चाबुकस्वार यांच्यासह जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. महिला व युवतींवर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी आणि नराधमांना तत्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी आजच्या मेळाव्यात अंगणवाडी सेविकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा धारण केला होता. चार हुतात्मा पुतळा येथून अंगणवाडी सेविकांच्या रॅलीला सुरवात झाली. डॉ. फडकुले सभागृहात ही रॅली आल्यानंतर तेथे मेळाव्याला सुरवात झाली. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांतील अंगणवाडी सेविका आज मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
हेही वाचा : एक न्यारं गाव; शेळकेवाडी त्याचं नाव 
सावित्रीच्या आम्ही लेकी... 
कोण आली रे कोण आली....सावित्रीची लेक आली, कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही. नराधमांना फाशी झालीच पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबलेच पाहिजे यासह अनेक घोषणांनी आज डॉ. फडकुले सभागृह परिसर दणाणून गेला. रॅलीत आणि मेळाव्यात सहभागी महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा लावलेला मुखवटा लक्षवेधक ठरत होता. आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्या असल्याच्या बघायला मिळाल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता होत नसल्याबद्दलही सेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

Latest Marathi News Live Update: नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक

SCROLL FOR NEXT