Anger at the construction of a low-rise bridge in the eastern part of Miraj 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज पूर्व भागात कमी उंचीचे पूल बांधल्याने संताप

अजित झळके

सांगली : मिरज पूर्व भागातून गेलेल्या दिघंची ते हेरवाड या नव्या राज्य मार्गावरील मोठ्या ओढ्यांवर कमी उंचीचे पूल बांधले जात असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रमुख राज्य मार्गावर उंचीचे बांधावेत, ओढ्याच्या दोन टोकांशी समांतर पूल असले पाहिजेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्याबाबत कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

त्यासाठी या विभागाने या "हायब्रीड' योजनेच्या निधीशिवाय स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकर निर्णय झाल्यास कमी उंचीच्या पुलांवर नाहक खर्च होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 

या राज्य मार्गावर सलगरे, बेळंकी, शिपूर, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी येथे मोठे पूल आहेत. आढओढ्यावरील पूल सर्वात धोकादायक आणि मोठा आहे. या सर्व ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही टोकांना समांतर पूल बांधले तरच पावसाळ्यात विनाअडथळा वाहतूक सुरु राहू शकणार आहे. याबाबत एरंडोली, मल्लेवाडी ग्रामपंचायतीसह मिरज पूर्व भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. त्याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे आणि या राज्य मार्गाला पूरमुक्त ठेवण्यासाठी उंच पूल बांधावेत, अशी मागणी केली आहे. 

भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रविकांत साळुंखे म्हणाले, ""सलगरेपासून मिरजेपर्यंत या रस्त्यावरील ओढ्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. रस्ता दोन दिवस बंद होता. नवीन पूल केल्यानंतर हीच परिस्थिती राहणार असेल तर उपयोग काय? छोटे पूल न करता एकदात उंचीचे पूल बांधावेत.'' कॉंग्रेसतर्फे धनराज सातपुते, अमोल पाटील, सुनिल पाटील, फक्रुद्दीन नांद्रेकर, सुनिल गुळवणे, स्वराज्य पाटील यांनी निवेदन दिले आहे. 

महिलेचा बळी गेला 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने ओढ्याला प्रचंड पाणी आले आहे. कमी उंचीचा पूल असल्याने मल्लेवाडी येथे एक महिला वाहून गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्यात यश आले. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते बंद होतात. यावर पुन्हा कमी उंचीचे पूल बांधणे काय कामाचे, असा सवाल करण्यात आला आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT