annasaheb patil mahamandal.jpg
annasaheb patil mahamandal.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या  कर्जांनाही तीन हप्त्यांची सवलत 

सकाळवृत्तसेवा

सांगली-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तीक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या कर्जानाही रिझर्व्ह बॅंकेने दिलेली तीन महिने हप्ता न भरण्याची सवलत लागू आहे. त्यांना त्यानंतरही नियमित व्याज परतावा करण्यात येणार आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 


सध्याच्या "कोविड 19'च्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या परिपत्रकामध्ये सर्व बॅंका, वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जांना पुढील तीन महिने हप्ते न भरण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या ज्या लाभार्थ्यांनी तसेच लाभार्थी गटांनी व्यवसायासाठी बॅंका तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे त्यांनाही पुढील तीन महिने कर्ज हप्ता न भरण्याची मुभा लागू असेल असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एका परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. 


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी सुमारे नऊशे कोटींची कर्जे घेतली आहेत. महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना तसेच गट कर्ज व्याज परतावा योजना या अंतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना बॅंकेच्या ईएमआय वेळापत्रकानुसार हप्ता भरणा केल्यानंतरच महामंडळामार्फत व्याज परतावा करण्यात येतो. मात्र सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने कर्जदारांना तीन महिने हप्ता न भरण्याची सवलत दिली आहे. हीच सवलत महामंडळाच्या लाभार्थ्यांनाही लागू आहे. 


श्री. पाटील यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महामंडळाच्या लाभार्थ्यांनी तसेच लाभार्थी गटांनी तीन महिन्यांनंत नियमित हप्ते भरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना नियमित व्याज परतावा करण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे, गटाचे सीसी कर्ज किंवा टर्म कर्ज असेल त्यांनाही हे परिपत्रक लागू असल्याचे म्हटले आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT