shirala police.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा तालुक्‍यातील आणखी एका पोलिसाचा मुंबईत "कोरोना' ने मृत्यू

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली)- नागपाडा( मुंबई) येथील पोलिस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथकात हवालदार असणाऱ्या पाडळी (ता. शिराळा) येथील दिलीप विठ्ठल पाटील (वय 46) यांचा कोरोनामुळे मृत्य झाला. पोलिस दलात असणाऱ्या शिराळाच्या सुपुत्रांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची दोन दिवसात ही दुसरी घटना आहे. 


याबाबत समजलेली माहिती अशी, दिलीप पाटील हे गेली पंचवीस वर्षांपासून पोलीस दलात काम करत आहेत. ते आपल्या कुटुंबा समवेत नागपाडा पोलीस ठाणे परिसरात रहात होते. त्यांना कामावर जायचे असल्याने ते आपल्या पत्नी समवेत तिथे राहिले.लॉक डाऊन सुरू होणार असल्याने त्यांच्या दोन मुली गावी पाडळी येथे आल्या आहेत. पाटील नेहमी प्रमाणे कामावर जात होते. त्यांना 10 मे रोजी ताप आला होता.त्यानंतर त्यांना ताप आला नाही पण खोकला होता. त्यावर उपचार ही सुरू होते. 


शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांना बोलावून नायर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पोलीस ठाण्याच्या गाडीतून नेण्यात आले.पण त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यांना तिथे घेतले नाही. तिथून भाटिया हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. प्रारंभी त्या ठिकाणी त्यांना घेण्यास नकार दिला. त्यावेळी रुग्ण व आम्ही सोबत असणारे पोलिस असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यासाठी एक बेड तयार केले. पण दहा मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर पुढील तपासणीसाठी जे.जे हॉस्पिटल येथे मृतदेह घेण्यात आला. त्याठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.त्याचा रिपोर्ट आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर रात्री उशिरा चंदनवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, अविवाहित दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे .त्यांच्या मृत्यूमुळे शिराळा तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे. 

दुर्दैव दोघांचा मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह 
शिराळा तालुक्‍यातील दोन दिवसापूर्वी अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दुसऱ्या दिवशी पोलीस हवालदार दिलीप पाटील यांचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दोघांचे दुर्दैव एकच अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT