Another wedding story ... two brides got their parents' umbrella 
पश्चिम महाराष्ट्र

एका दुसऱ्या लग्नाची गोष्ट... दोन चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र

सतीश तोडकर

भिलवडी : एका लग्नाची गोष्ट आपण अनेकदा ऐकतो... पण ही आहे दुसऱ्या लग्नाची गोष्ट... या दुसऱ्या लग्नाने सामाजिक, भावनिक बंधनांच्या अनेक चौकटी ओलांडल्या... त्याचबरोबर दोन निरागस चिमुकल्यांना आई-वडिलांच्या मायेचे छत्र मिळाले.

औदुंबर (ता. पलूस) येथे तानाजी आणि भारती यांचा मुलांच्या साक्षीने विवाह झाला. पलुस तालुक्‍यातील तानाजी किसन मालुसरे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. अशीच कथा वाळवा तालुक्‍यातील भाटवाडेच्या भारती प्रकाश चव्हाण यांची. मुलगा सात महिन्याचा असताना त्यांच्या पतीचे निधन झाले होते. आता मुलगा आठ वर्षांचा आहे. दोघांचेही आयुष्य एकाकी झाले होते, मुलांच्या पालनपोषणाचीही जबाबदारी होती. त्या दोन्ही चिमुकल्यांच्या जीवनातही मायेची एक बाजू रिकामी होती. 

या चौघांच्या जीवनात आनंदाची झुळूक आणली ती सावळजच्या इच्छापूर्ती संस्थेने. दोघांची नव्याने लग्नगाठ बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केला. दोघेही वेगवेगळ्या समाजातील. जातीपातीचे बांध ओलांडत त्यांनी मुलांसह एकमेकांना स्वीकारले. सुसंस्कार देत त्यांचे भविष्य घडवण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे दोघांच्याही नातेवाईकांनी याला संमती दर्शवली. भारतीच्या वडिलांनी यासाठी पुढाकार घेतला. मुलांचेही स्वभाव जुळले. सर्वांची संमती मिळताच विवाह ठरला. नवरी नटली, वऱ्हाड जमले आणि दत्तगुरूंचा साक्षीने औदुंबर येथे थाटात विवाह सोहळा झाला. या विवाहाने दोघांच्या मुलांना आई-वडीलांचे छत्र लाभले. त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. 

या विवाहासाठी इच्छापूर्तीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिन सावंत, सुनिल गायकवाड, दीपक भोसले, वैभव राजेभोसले, जितेंद्र पाटील, वैभव माने यांनी धावपळ केली. पोरक्‍या मुलांना आई वडीलांच्या मायेचे छत्र मिळवून देवून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. इच्छापूर्ती संस्था अशा पद्धतीचे विवाह मोफत लावू देणार असल्याचे दत्तात्रय पाटील यांनी सांगितले. 

मुलांनाही आई-वडील मिळाले

मुलगा 7 महिण्याचा असताना पतीचे निधन झाले. आमचे अन मुलांचे स्वभाव जुळले. मुलांनाही आई-वडील मिळाले. दोन्ही कुटुंबाचा छानसा परिवार तयार झाला आहे. जीवनाची नव्याने सुरुवात करताना आनंद वाटतोय... 
- सौ. भारती 

इच्छापूर्ती संस्थेने योग घडवला
इच्छापूर्ती संस्थेने योग घडवला. दुसऱ्या लग्नासाठी प्रवृत्त केले. त्याने जीवनात नवी ईनिंग सुरू करता आली. संस्थेच्या माध्यमातून अशा जोडप्यांचे नव्याने संसार उभा करण्याचा इच्छापूर्ती पॅटर्न उपयुक्त आहे. 

- तानाजी मालुसरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT