Anuradha Nagwade dreams of minister 
पश्चिम महाराष्ट्र

समधेच बुचकळ्यात : वहिनीसाहेबांना डायरेक्‍ट मंत्री व्हायचंय 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अद्यापि अवकाश आहे. मध्यावधीही होण्याची शक्‍यता नाही. परंतु श्रीगोंद्यातील वहिनीसाहेबांनी थेट मंत्रिपदाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे सध्या त्या आमदारही नाहीत. त्यामुळेच श्रीगोंदाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचे त्यांच्या या मंत्रिपदाच्या घोषणेने लक्ष वेधले आहे. त्यांचे विरोधक मात्र, या घोषणेने बुचकळ्यात पडले आहेत. 

पांघरून घेणाऱ्या निष्ठावंतांना उत्तर
या वहिनीसाहेब म्हणजे अनुराधाताई नागवडे. मंत्री होण्यासाठी अर्थातच आमदारकी अगोदर जिंकावी लागेल. आणि त्याचीच तयारी त्यांनी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव नागवडे (बापू) यांचे निष्ठावंत असे पांघरून घेणाऱ्या जवळच्या काही निष्ठावंतांना थेट उत्तर देत जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे यांनी काल (सोमवारी) आक्रमक रूप दाखविले. 
""बापूंनी समाजासाठी खूप दिले; मात्र आता त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यातीलच एक मंत्रिपदाचे स्वप्न आपण संतांचा आशीर्वाद आणि समाजाची साथ घेऊन पूर्ण करू,'' अशी घोषणा करून त्यांनी आमदारकीची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले. 

बापूंच्या जयंतीदिनी घोषणा 
शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात अनुराधा नागवडे यांनी पहिल्यांदाच आक्रमकपणा दाखविला. त्यांच्या भाषणाला असणारी धार अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. बापूंच्या जवळचे काही जण बापूंचे राजकीय संस्कार असल्याचे सांगत आहेत, असा संदर्भ देत त्या म्हणाल्या, ""तुमच्यावर जर बापूंचे संस्कार आहेत, तर त्याचे दोन पुत्र राजेंद्र आणि दीपक यांनी वडिलांकडून काही तरी घेतले असेलच ना! केवळ दिशाभूल करण्यासाठी खटाटोप सुरू असतो. कारखान्याची सत्ता लोकांसाठीच असते, हे राजेंद्र नागवडे यांनी कृतीतून दाखविताना वडिलांचे संस्कार दाखवून दिले आहेत.'' 

संतांचा आशीर्वाद 
बापूंचे काही स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे सांगत नागवडे म्हणाल्या, ""कारखान्याचा कारभार चांगला चालविणे हा जसा त्यातीलच एक भाग आहे, तसा राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविणे हेही त्यांचे स्वप्न होते. आता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासारख्या संतांचे आशीर्वाद आणि समाजाचे पाठबळ या जोरावर ते आपण पूर्ण करून दाखवू.''  

 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update :Mumbai live : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

Maharashtra Budget: महाराष्ट्राचे नवे गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर! 4 लाख उच्च-कुशल रोजगारांचे लक्ष्य; उद्योगांना काय फायदे?

Long Life Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात; सत्तरीनंतरही 'नो आजार', राहतात एकदम निरोगी

Second Solar Eclipse 2026: एक झालं आता दुसरं सूर्यग्रहण कधी? तारीख, वेळ जाणून घ्या! भारतावर याचा काय परिणाम

OC Policy: गृहनिर्माण संस्थांसाठी गुड न्यूज! बीएमसी लवकरच लागू करणार नवी ओसी पॉलिसी; नवे धोरण कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT