apple garden in Dongarwadi 
पश्चिम महाराष्ट्र

डोंगरवाडीच्या माळरानावर सफरचंदाची बाग

भगवान शेवडे

मांगले : शिराळा तालुक्‍यातील देववाडीच्या विजय सर्जेराव खोत या निवृत्त एस. टी. वाहकाने डोंगरवाडीच्या माळरानात बारा गुंठे क्षेत्रावर सफरचंदाच्या रोपांची लागण करून यशस्वी प्रयोग केला आहे. हिमाचल प्रदेशातील डोंगरात काय कुसळच पिकणार की म्हणून हिणवणाऱ्याना चपराक ठरणार आहे. ज्या प्रदेशात सफरचंदाची लागवड केली जाते त्याठिकाणी सरासरी लागण केल्यापासून तीसऱ्या वर्षी फळे मिळायला सुरवात होते. मात्र खोत यांनी वर्षभरापुूर्वी लावलेल्या काही झाडांना चांगल्या दर्जाची फळे दिसू लागली आहेत. 

खोत एस. टी. च्या सेवेत होते. तरीही दरवर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करून ऊस, केळी, शेवगा, पपई, गुलाब फुले असे वेगवेगळे उत्पादन घेतच होते. तीन वर्षापूर्वी निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी चिकाटी सोडली नाही. 

सोशल मिडीयावर युट्युबवरील माहिती पाहून त्यांनी हिमाचल प्रदेश गाठले. विलासपूर येथील शेतक-याची माहिती काढून त्यांच्या शेतातील सफरचंदाची बाग बघून एक वर्षापूर्वी त्यांनी सफरचंदाच्या चार वेगवेगळ्या जातीची 175 सफरचंदाची रोपे 200 रुपये प्रमाणे खरेदी करून बुकिंग करून ठेवली. नोव्हेंबर 2020 मध्ये रेल्वेतून ही रोपे का-हाड रेल्वे स्थानकावर आली. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी डोंगरवाडीजवळच्या पत्नीच्या नावे असणा-या चार एकर क्षेत्रापैकी 12 गुंठे क्षेत्रावर 3 X 3 व्यासाचे खड्डे घेवून रोपांची लागण केली. त्यांनी प्रत्येक खड्ड्यात दोन ट्रॉली शेणखत घातले. 

वडिलांच्या आजरपणामुळे बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे 50 रोपे खराब झाली. मात्र सध्या 125 रोपे अतिशय चांगल्या प्रकारे वाढली आहेत. खत, औषधांचा शून्य खर्च वर्षभरात केला, पाणी अतिशय कमी लागत असल्यामुळे व्याप कमी झाले आहे. जूनमध्ये झाडांची छाटणी केल्यामुळे आत्ता आलेल्या फुटव्यांना चांगली फुलकळी पडली होती. काही झाडांना फळे लागली आहेत. हार्बन, अण्णा, डोअर शेट गोल्ड या जातीची रोपे शेतात आहेत. फळे लागताना मागे पुढे लागत आहेत. पुढील वर्षापासून चांगली फळे मिळणार आहेत. वर्षभर झाडांना फळे लागली आहेत याचा अर्थ येथील वातावरण पिकाला पोषक आहे. पुढील वर्षी फळांची संया बघून क्षेत्र वाढवणार असल्याचे श्री.खोत यांनी सांगितले. 

सरासरी 1 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल,अशी अपेक्षा आहे,असेही त्यांनी सांगितले.श्री.खोत यांनी या सफरचंदाच्या बागेत आंतरपीक म्हणून उन्हाळी भुईमुगाची लागण केली आहे. त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही घेतल्या आहे. यातही दूरदृष्टी ठेवून प्रयोग केला आहे. झाडांच्या बाजूच्या मोकळ्या क्षेत्रात तण डोके वर काढेल म्हणून त्यांनी आंतरपिके घेतली. कोणत्याही तणनाशकाचा ते फावरणी करीत नाहीत. खोत यांची देववाडीत दोन एकर शेती आहे त्या क्षेत्रात ऊस लागवड केली आहे. 

मी छंद म्हणून शेतात वेगवेगळे प्रयोग घेत आहे. उत्पन्न किती मिळेल याचा कधी विचार केला नाही. सफरचंदाची लागवड यशस्वी होत आहे. सध्या लागलेली फळे बघून आनंदही होत आहे. द्राक्ष, डाळींबासाठी औषधांचा मारा करावा लागतो. माझ्या बागेत औषध, खतांचा खर्च शून्य आहे. पुढील वर्षी क्षेत्र आणखी वाढवणार आहे. इतर पिकांसाठीही यापुढे सेंद्रिय खत वापरण्यावर भर देणार आहे. 
- विजय खोत 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT