Appointment of supervisory, administrative officers in the district 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात पर्यवेक्षीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती 

विष्णू मोहिते

सांगली : सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पाहता खासगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे, अशा खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधितांना योग्य पध्दतीने दाखल करुन घेणे, त्या ठिकाणी रूग्णवाहिका तसेच शववाहिकेची आवश्‍यकता असल्यास संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधून पूर्तता करून घेणे, रूग्णांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सात खासगी हॉस्पीटलसाठी 4 पर्यवेक्षीय अधिकारी व 14 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
 
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय (सांगली), कुल्लोळी हॉस्पीटल (सांगली) व मिरज चेस्ट सेंटर (मिरज) साठी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे (9158686123) यांची नियुक्ती केली आहे. वाळवेकर हॉस्पीटल (सांगली) व विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर(बामणोली) येथे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एन. बी. कोळेकर (9960687492) तसेच मेहता हॉस्पिटल (टिंबर एरिया, सांगली) करीता जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व वॉन्लेस हॉस्पिटल (मिरज) करीता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख किशोर जाधव (9422532636) यांची नियुक्ती केली आहे. 

हॉस्पीटलनिहाय नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असे. (पहिले अधिकारी सकाळी 10 ते रात्री 10 आणि दुसरे अधिकारी रात्री दहा ते सकाळी 10 भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय (सांगली). 9689742484 व 9405553953). कुल्लोळी हॉस्पीटल (सांगली-9075377001 व 9405292386). मिरज चेस्ट सेंटर (मिरज)-9403964253 व 9637455585. वाळवेकर हॉस्पीटल (सांगली)- 9404879812 व 9552966799. विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर (बामणोली) 7722015999 व 9029030490. मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया (सांगली) 7972221721 व 9689711777. वॉन्लेस हॉस्पिटल (मिरज) 9764803098 व 9975297806 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्यावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देण्याबाबत कामकाज करणे, रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देणे हे कामकाज करावयाचे आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रूग्णालयातील बेड संख्येच्या उपलब्धतेप्रमाणे रूग्णांना दाखल करून घेतले जाते अगर कसे याबाबत तसेच प्रशासकीय सर्व कामकाज पाहणे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रणालीमध्ये हॉस्पिटलमधील बेड संदर्भातील दैनंदिन माहिती भरण्याचे कामकाज करावयाचे आहे. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT