mane
mane 
पश्चिम महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यातील ७२८ मुलींना सायकलीसाठी ३२ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर- प्रवीण माने

राजकुमार थोरात

वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील इयत्ता पाचवी व सहावीमधील ७२८ मुलींना सायकलीसाठी ३२ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन माहिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०१८-१९ मधील दहा टक्के निधीमधून इयत्ता पाचवी व सहावीमधील ७२८ मुलींसाठी ३२ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एका मुलीला सायकल घेण्यासाठी साडेचार हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 

सायकल खरेदी करुन पावती दिल्यानंतर संबधित लाभार्थीच्या खात्यावर साडेचार हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक मुलींना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागत होती.  इयत्ता पाचवी व सहावीतील मुलींना सायकल मिळणार असल्याने शाळेमध्ये ये-जा करण्याचा प्रवास सोईस्कर होणार आहे. तसेच शाळेमधील मुलींच्या गळती प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये महिलांना व मुलींना सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु असल्याचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT