Are we not worthy? 
पश्चिम महाराष्ट्र

आम्ही योग्यतेचे नाही का? 

दौलत झावरे

नगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना मात्र पुरस्कारांमध्ये तेवढे स्थान दिले जात नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना नेहमीच पुरस्कारात कमी स्थान दिले जात आहे. आम्ही पुरस्काराच्या योग्यतेचे नाही काय, असाच सवाल करत काही जणींनी खंतही व्यक्त केली. 

येथे क्‍लिक करा हे आधार कुणाचे? 

जिल्ह्यात 1316 ग्रामपंचायती असून, त्यांसाठी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची एकूण 1205 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये ग्रामसेवकांच्या 952, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या 253 पदांचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामसेवकांची 857, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांची 227, अशी एकूण 1084 पदे भरलेली आहेत. यामध्ये ग्रामसेवक म्हणून 222 आणि ग्रामविकास अधिकारी म्हणून नऊ महिला कार्यरत आहेत. घर सांभाळून महिला गावगाड्याचा कारभार चोखपणे पार पाडत आहेत. 

विशेष म्हणजे, पुरुष ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांप्रमाणेच महिलांनाही एकापेक्षा जास्त ग्रामपंचायती सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. या सर्व जबाबदाऱ्या विनातक्रार व कोणाच्या तक्रारी येऊ न देता त्या चोख पार पाडत आहेत. असे असतानाही पुरस्कार देताना प्रशासनाकडून त्यांचा विचार होत नाही. जिल्ह्यातील सुमारे 58 ग्रामसेवकांच्या विभागीय चौकशा सध्या सुरू आहेत. त्यांत फक्त दोनच महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

महिलांचे काम चांगले असतानाही त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांमध्ये मात्र मानाचे स्थान मिळत नसल्याने, महिला ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दर वर्षी महिलांपेक्षा पुरुषांनाच हे पुरस्कार दिले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे महिलांना 50 टक्‍क्‍यांचे आरक्षण दिले, तसेच पुरस्कारांमध्ये महिलांनाही स्थान द्यावे, अशी मागणी होत आहे. 

महिलांचे काम उत्कृष्ट 
महिलांचे काम उत्कृष्ट आहे. प्रत्येक महिलेने आपले काम सिद्ध करून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. 
- एकनाथ ढाकणे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना 

पदे मंजूर : 1205 
कार्यरत : 1084 
ग्रामसेवक : पुरुष : 635, महिला : 222 
ग्रामविकास अधिकारी : पुरुष : 218, महिला : नऊ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT