Armenian Zhavan winner in online chess tournament
Armenian Zhavan winner in online chess tournament 
पश्चिम महाराष्ट्र

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत आर्मेनियाचा झावान विजेता 

घनशाम नवाथे

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत आर्मेनिया देशाच्या ग्रॅंडमास्टर एंड्रियासियन झावान याने विजेतेपद पटकावले. 

रोख 55,000 रुपये पारितोषिकाची आणि कोणतीही प्रवेश फी नसलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत आर्मोनिया, इराण, उझबेकिस्तान, रशिया, अझरबैजान, अर्जेटिना, सर्बिया, युके, कतार, जर्मनी, सिंगापूर, युएई, रशिया, फिलिपाईन्स, नायझेरिया, रूमानिया, चिली, घाना, युगांडा, तुर्की, मॉंटोनग्रो, इजिप्त, मलेशिया, क्‍युबा, हंगेरी, आर्यलॅंड, बेलूरूस, व्हेनाझुएला, स्पेन, स्लॅव्हकिया, कोलंबिया, तुर्केमनिस्तान आणि भारतातील एकूण 15 ग्रॅंडमास्टर, 20 आंतरराष्ट्रीयमास्टर, 18 फिडेमास्टर, 6 कॅंडेड मास्टर व 1700 आंतरराष्ट्रीय मानांकितासह 2363 खेळाडू सहभागी झाले होते. 

स्पर्धेत आर्मेनियाच्या एंड्रियासियन झावान याने 92 गुणांसह विजेतेपद पटकावले. इराणच्या सदाव शाहिनने 86 गुणांसह द्वितीय, उझबेकिस्तानच्या सिंदारोव जावोहीरने 81 गुणांसह तिसरे, रशियाच्या झुब्रिस्की आर्टिओमने 78 गुणांसह चौथे, अझरबैजानच्या मडोव्ह झौरने पाचवे स्थान मिळवले. उझबेकिस्तानच्या अब्डुसॅटॉरोव्ह नोडिरबेकने सहावे, अर्जेटिनाच्या मॅन्युअल क्रिस्टबलने सातवे, मल्युकास लिआस्कोव्हिचने आठवे, भारताच्या रोनायक घोषने नववे, पीरवर्डियेवअगलने दहावे स्थान मिळवले. 

स्पर्धेत उत्कृष्ट महाराष्ट्र खेळाडू म्हणून धनश्री राठी, जितेंद्र पाटील, प्रथमेश दिवेकर, दिलीप पाणीग्रही, किरण बेमरकर यांनी तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रीया हिप्परगी, श्रीधर वेल्हाळ, आदित्य कोळी, आदित्य टिळक, गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी बहुमान मिळवला. जिल्ह्यातील चिराग रेड्डी, अव्दैक फडके, अनुजा कोळी (8वर्षे गट), ईश्वरी जगदाळे, रुद्र जाधव, वेदांग कोरे (11 वर्षे गट), पवन सी राव, सृष्टी हिप्परगी, समर्थ कुलकर्णी (14 वर्षे गट), राजप्रिया जंगम, मुदीत देवधर, मानस भगत (17 वर्षे गट) उत्कृष्ट खेळाडू ठरले. 

नगरसेवक संतोष पाटील यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती. मंगेश येडुरकर, केपीएस चेस ऍकॅडमी संचालक विजयकुमार माने यांच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित केली. फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर- माने यांनी संयोजन केले. पंच विवेक सोहनी, आनंदबाबू, स्वप्नील बनसोड, दीपक वायचळ, शार्दुल तपासे, आनंदिता प्रदीप यांनी काम पाहिले. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT