Arrested in 24 hours for online loan fraud 
पश्चिम महाराष्ट्र

कर्जासाठी ऑनलाईन फसवणाऱ्यास चोवीस तासांत अटक

प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : बोगस कंपनीद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्यास मिरज शहर पोलिसांनी केवळ चोवीस तासांत अटक केली. रमेश नाना निकम (वय 32, रा. मार्डी ता. माण जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून फसवणुकीची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज शहर पोलिस ठाण्यातील संजय येवले या गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे हा संशयित भामटा रमेश निकम हा पोलिसांच्या हाती लागला आणि अनेकांची फसवणूक टळली.

मिरज शहरातील बोलवाड रस्त्यावर सचिन नायकु बरगाले यांचे खताचे दुकान आहे. त्याचा फोन नंबर घेऊन संशयित भामटा रमेश निकम यांने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी व्यावसायिक स्वरुपात मदत करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी आपण लेंडिग मार्क या कंपनीची स्थापना केल्याचीही बतावणी केली. बरगाले यांच्याशी सातत्याने संपर्क साधून संशयित ठकसेन रमेश निकम याने चौदा लाख रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना कमिशन द्यावे लागेल, असेही बरगाले यांना सांगितले. आणि ही रक्कम आपल्या मध्यस्थीनेच द्यावी लागेल असे सांगून त्यासाठी निकम याने स्वतःचा बॅंकेतील खाते नंबरही दिला. आणि याच खात्यावर 1 लाख 8 हजार 880 रुपयांची रक्कम स्वीकारली. 

हा सगळा व्यवहार करताना संशयित ठकसेन निकम याने जो मोबाईल नंबर वापरला होता त्याच्याच आधारे पोलिसांनी या ठकसेनास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 1 लाख 8 हजार 880 रुपयांची रक्कम हस्तगत केली. ही कारवाई करताना येवले यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulshan Kumar यांच्या हत्येचं रहस्य २८ वर्षांनंतर उघड, मृत्यूच्या दीड वर्षाआधीच रचला होता कट, तपास अधिकाऱ्यांनी सांगितली आतली गोष्ट

Messi's India Visit : जगप्रसिद्ध फुटबॉलपट्टू मेसीसमोर बारामतीकर अजिंक्य देशपांडे यांचे टँगो नृत्य सादरीकरण!

Akola Accident : कापूस वेचून परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले; दोघांचा मृत्यू; ११ गंभीर जखमी!

Viral Couple Dance Video : 'कपल'ने सोशल मीडियावर केली हवा; भन्नाट ‘डान्स’ तुम्ही पाहिला का?

Ajit Pawar : तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती रखडली; बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन!

SCROLL FOR NEXT