bottle art
bottle art 
पश्चिम महाराष्ट्र

काचेच्या बाटलीत अवतरलीय ही कलाकृती

संदिप खांडेकर

कोल्हापूर - काचेच्या बाटलीत आबांच्‍या कलाकृती
काजी संतू सुतार यांचे हात-पाय थरथरत नाहीत. ऊर्जेने भारलेल्या त्यांच्या शरीराचा आकडा पंचाण्णव आहे. शास्त्रीय संगीताच्या पाचशे मैफिलींना त्यांचा स्वरसाज चढलाय. आयुर्वेदाच्या ज्ञानाचा साठा त्यांच्या नसानसात आहे. काचेच्या बाटलीत साकारलेल्या त्यांच्या कलाकृती डोक्‍याला झिणझिण्या आणतात. शंभरावर गायकांना स्वरांतील तरलता, प्रसन्नता, हरकतींचे धडे देण्यातला हा बिलंदर कलाकार. शब्द व स्वरांवर संशोधन करणारा हा अवलिया. प्रवचनातून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवतो. प्रसिद्ध कलाकारांच्या हृदयात यांनी आदराचे स्थान निर्माण केलंय.

अनेक जेष्ठ कलाकरासोबत आबांची उठबस

गडहिंग्लजच्या पुढे महागाव या गावातला संतू सुतार स्वरांतला बाप माणूस. हातात करवत धरून यांनी स्वरांना घोटवलं. संगीतातल्या प्राथमिक शिक्षणासाठी आबा ऊर्फ भिकाजी यांनी त्यांचच बोट पकडलं. महागावातल्या प्राथमिक शाळेची हवा आबांना बाधली. शिक्षणाचं घोड दुसरीतचं अडलं. सुतारकामात आबांचा हात पट्टीचा होता. विठ्ठल महागावकरांना आबांच्या कामांचं कौतुक होतं. संतू सुतार यांनी कोल्हापूरला येऊन हवापालट केली. गावाकडच्या घराकडे येणे-जाणे मात्र सोडले नाही. आबांच्या संगीतातल्या शिक्षणाला कोल्हापुरात आकार मिळाला. नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे, कृष्णा माळकर, अण्णासाहेब मडिलगेकर यांच्याकडे रियाजात त्यांनी वर्षे घोटली. व्हिनस टॉकिजमध्ये त्यांची सुतारपदी नेमणूक होती. तबलावादक झाकीर हुसेन, अभिनेते दादा कोंडके, राजेंद्र कुमार, अभिनेत्री प्रिया अरुण अशा अनेकांशी संवाद साधत हा कलाकार राज्याबाहेरही फिरला.

सुतारकामाचं ही आबांना वेड

आबा बेळगावच्या मुक्ती मठातील दगडी खांब, दगडी साखळी, हत्ती पाहून चमकले होते. दिल्लीतला कुतुबमिनार, आग्रा येथील ताजमहालच्या बांधकामाचेही त्यांना कोड होतं. बारीक-सारीक अभ्यासातून ते सुटत गेलं. त्यांच्या गायनाच्या ठिकठिकाणी मैफिली रंगत होत्या. डोक्‍यात सुतारकामाचं वेडही शाबूत होतं. चाळीस वर्षांच्या सेवेतल्या निवृत्तीनंतर लोकांची डोकी खाजवणाऱ्या कलाकृती करण्यात आबांचं डोकं लागलं. लाकडाच्या ओंडक्‍यातून साकारलेल्या लाकडी साखळीने अनेकांचे डोळे विस्फारले. संसारबेडी करण्यातील त्यांच्या शक्कलेची कॉपी कोणाला जमली नाही. ड्रीलने वीस हजार होल पाडून केलेली लाकडी चेन साखळी वेगळी ठरली. बिद्रीच्या सुताराने चेन साखळीचं आव्हान पेलण्यासाठी वर्ष घेतलं. चार लाकडे फोडून त्याच्या हाती धुपाटणं आलं.

काचेच्या बाटलीत कलाकृती साकारण्याचा आबांचा कारभार डोकं आऊट करणारा आहे. बाटलीतील शिडी, चौकट, दरवाजा, फिरता झोपाळा, डायनिंग टेबल-खुर्च्या, झोपाळा, धनुष्यबाणापुढं डोकं भणभणतं. आबांच्या कौशल्याची तारीफ करावी तेवढी थोडीच वाटते. दिवसा मागून दिवस ढकलत या कलाकृती आकाराला आल्या आहेत. भूलभुलैया सरगम कोडे करण्यात आबा कमी पडलेले नाहीत. आबांच्या अंगात नाना कलांचा मुक्काम आहे. हार्मोनियमचे स्वर व तबल्यातला ताल त्यांच्या बोटांत आहे. संगीत साधनेसाठी एक तप लागतं. एका वर्षात हार्मोनियम, तबला व गायनाचे शिक्षण देण्याचा अभ्यासक्रम ते लिहित आहेत. सूर का चुकतो, यावर त्यांचा अभ्यास आहे. भजनतपस्वी, तालप्रभू, भजन सम्राट या पुरस्कारांनी आबांच्या आयुष्याचं सार्थक झालंय. आबांच्या हाताला विश्रांती ठाऊक नाही. नातवांना स्वरज्ञान देताना कलाकृती करण्यातही ते रमले आहेत. या वयातली त्यांची स्मरणशक्ती भन्नाट आहे. विमानातून त्यांनी राजस्थानची नुकजीच सैर केली. डोळ्यांत साठलेली स्थळं आबांच्या तोंडातून बिनचूक बाहेर पडतात, हेही विशेष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT