arti.jpg
arti.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

साेलापूर : कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात घिरट्या 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याच्या निमित्ताने यावर्षी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे किलोमीटर परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. आतापर्यंत सुमारे 17 कोटींचा खर्च होऊनही प्रयोगाच्या नावाखाली विमानाच्या अवकाशात नुसत्याच घिरट्याच सुरु आहेत. प्रयोग अद्याप सुरुच असल्याने त्यासाठी आणखी वाढीव सात ते आठ कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
मागील वर्षीच्या दुष्काळाच्या झळा अद्याप संपलेल्या नसून सोलापुरातील मोहोळ, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यांसह मराठवाडा व विदर्भातील 90 हून अधिक तालुक्‍यातील बळीराजाला नैसर्गिक असो की कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने टॅंकरची संख्या अद्याप कमी झाली नसून भुगर्भातील पाणी पातळीही घटलेलीच आहे. आतापर्यंत राज्यात 2015 आणि 2018 मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने त्यातून दुष्काळाच्या झळा कमी होतील, अशी आशा बळीराजाला होती. मात्र, कोट्यवधींचा चुराडा करुनही प्रयोगाच्या नावावर कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानांच्या अवकाशात नुसत्याच घिरट्या सुरुच असल्याचे चित्र आहे. हा प्रयोग यशस्वी झाला का, त्यातून किती पाऊस पडला, यशस्वी प्रयोगासाठी ठोस संशोधन काय असावे, यावर कोणीच बोलत नाही. 

मुंबई, सोलापूर व औरंगाबाद येथे कृत्रिम पावसासाठी रडर यंत्रणा कार्यान्वित करुन त्या परिसरात पाऊस पाडण्यासाठी यंदा 30 कोटींची तरतूद केली. त्यापैकी काही रक्‍कम प्रयोगासाठी खर्च झाली मात्र, पाऊस किती पडला की पडलाच नाही हे सांगता येणार नाही. पावसाळा संपेपर्यंत प्रयोग सुरुच राहणार आहेत. 
- श्रीरंग घोलप, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय चक्रिवादळ धोके 

राज्याची स्थिती 
रडार यंत्रणा कार्यान्वित 

रडार यंत्रणेवरील खर्च 
430 कोटी 
प्रयोगासाठी आतापर्यंतचा खर्च 
17.70 कोटी 
आणखी होणारा अपेक्षित खर्च 
21 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT