Artist Shamkant Jadav No More
Artist Shamkant Jadav No More 
पश्चिम महाराष्ट्र

ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या पाच दशकांहून अधिक काळ येथील कला चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ चित्रकार श्‍यामकांत जाधव (वय ८५) यांचे  रात्री आकस्मिक निधन झाले. दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता उत्तरेश्वर पेठ येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे श्‍यामकांत जाधव. वयाच्या ८५ व्या वर्षानंतरही त्यांचा सळसळता उत्साह कायम होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनाने स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर खऱ्या अर्थाने कलापूर बनले. कोल्हापूर स्कूलचा नावलौकिक देशभरामध्ये पोचला. या कार्यामध्ये कलातपस्वी आबालाल रहेमान, बाबूराव पेंटर, रावबहादूर धुरंधर, दत्तोबा दळवी, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, चंद्रकांत मांडरे, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, बळीराम बिडकर, रा. शि. गोसावी, रवींद्र मेस्त्री, पी. सरदार, जी. कांबळे, अरविंद मेस्त्री यांच्यानंतर श्‍यामकांत जाधव यांचा मोठा वाटा आहे.

कोल्हापूरच्या चित्रमय इतिहासाचे प्रकाशन

कोल्हापुरातच त्यांचे कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण झाले. त्यांनी कोल्हापुरातच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरावर ३३ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. चित्रकार रा. शि. गोसावी व रवींद्र मेस्त्री यांचा सहवास त्यांना मार्गदर्शक ठरला. आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या. कोल्हापूर, नागपूर येथील कलासंग्रहालयाबरोबरच नॅशनल आर्ट गॅलरी, नवी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृती विराजमान आहेत. वास्तववादी ते सृजनात्मक व अमूर्त शैली, टेराकोटामध्ये त्यांच्या कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अमेरिका, कॅनडा, नायजेरियासह देशातील मान्यवरांच्या संग्रही त्यांच्या कलाकृती आहेत.  कथा, कविता, ललित, व्यक्ती, प्रासंगिक याबरोबरच ‘रंग चित्रकारांचे’ या पुस्तकाच्या माध्यमातून कोल्हापूरचा चित्रमय इतिहास त्यांनी प्रकाशित केला आहे.

‘रंगबहार’ संस्थेची स्थापना

१८ जून १९७८ रोजी श्‍यामकांत जाधव यांनी ‘रंगबहार’ या संस्थेची स्थापना केली. जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या हस्ते आणि चित्रकार, शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्या प्रेरणेने हे व्यासपीठ अस्तित्वात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे ही संस्था साऱ्या महाराष्ट्रभर आणि कर्नाटकाच्या मोठ्या भागात लौकिक मिळवून आहे. ‘मैफल रंगसुरांची’ या उपक्रमाद्वारे नव्या-जुन्या कलारत्नांना आपल्या मंचावर आणून रसिकांसमोर त्यांचे सादरीकरण केले. प्रत्येक वर्षी जानेवारीत पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सळसळता उत्साह

श्‍यामकांत जाधव आणि सळसळता उत्साह हे एक समीकरण होते. जानेवारीत होणाऱ्या रंगबहार संस्थेच्या ‘मैफल रंगसुरांची’ या उपक्रमासाठी पूर्वतयारीची बैठक नुकतीच झाली होती. या उपक्रमासाठी स्वतः दहा हजार रुपयांचा निधी देतो, असे त्यांनी सांगितले होते; मात्र त्यांच्या अनपेक्षित जाण्याने सर्वांना धक्का बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT