Ashutosh Gowariker meet to kolhapur sakal office 
पश्चिम महाराष्ट्र

नव्या तंत्रज्ञानाचा शोधही कलापुरातच लागेल...! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : कोणतीही अद्ययावत साधने उपलब्ध नसताना भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलापूर कोल्हापुरातच तयार केला होता. सध्या एखाद्या सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याला बाहेरून घ्यावे लागते. त्यामुळे असे तंत्रज्ञानही कदाचित कोल्हापूरचाच एखादा तंत्रज्ञ लवकरात लवकर सिनेसृष्टीला देईल, असा विश्‍वास आज प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केला. 

श्री. गोवारीकर यांनी आज "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सकाळ परिवारातील सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, त्यांचे आई-वडिल अशोकराव गोवारीकर, किशोरी गोवारीकर यांनीही विविध आठवणींना उजाळा दिला. "सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी त्यांचे स्वागत केले. निवासी संपादक निखिल पंडितराव यावेळी उपस्थित होते. 

"स्वदेश', "लगान' असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला "पानिपत' या सिनेमापर्यंतचा प्रवास उलगडताना त्यांनी सिनेमा आणि एकूणच समाज अशा अनुषंगांने विविध अंगांनी संवाद साधला. 
ते म्हणाले, ""सिनेमांच्या निर्मितीचा खर्च कमी करून अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी बदलते तंत्रज्ञान स्वीकारावेच लागते. पण, त्याचा नेमका किती आणि कुठे वापर करायचा, हा प्रत्येक दिग्दर्शकाचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो. मुळात आपल्याला जो विषय समाजापर्यंत न्यायचा आहे. त्याच विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यावर सिनेमा साकारण्याचे धाडस करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. आणि हे सिनेसृष्टी अधिक सजगपणे पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.'' 

बदलती अभिरूची... 
सध्या समाज प्रचंड वेगाने बदलतो आहे. तंत्रज्ञानापासून ते लोकांच्या अभिरूचीपर्यंत साऱ्याच गोष्टीही बदलू लागल्या आहे. त्यामुळे सिनेमा तयार करताना लोकांच्या अभिरूचीचा प्राधान्याने विचार करावा लागतो. साठच्या दशकातील लोकांची मानसिकता वेगळी होती. पुढे ऐंशीच्या दशकात ती आणखी बदलली. तेंव्हाच्या सिनेमातील अनेक खलनायकांना पुढे आपण नायक म्हणूनही डोक्‍यावर घेतले होते, असेही श्री. गोवारीकर म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT