Assassin attack 
पश्चिम महाराष्ट्र

तलाठ्यावर खुनी हल्ला

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (नगर) : वांबोरी- पांढरीपूल रस्त्यावर गुंजाळे शिवारात आज दुपारी दोनच्या सुमारास चौघांनी कात्रड-गुंजाळे (ता. राहुरी) येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 31, रा. रुईछत्तीशी, ता. नगर) यांच्यावर खुनी हल्ला केला. नंतर हल्लेखोर दोन दुचाकींवरून पांढरीपुलाच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात पाडळकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथे खासगी रुग्णालयात हलविले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 


गुंजाळे ग्रामपंचायतीच्या एका जागेची पोटनिवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याची मतदारयादी देण्यासाठी गुंजाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात तलाठी पाडळकर आले होते. काम आटोपल्यावर ते दुचाकीवरून कात्रडकडे जात होते. दरम्यान, गुंजाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून दोघे त्यांच्या मागावर होते, तर दुसऱ्या दुचाकीवर दोघे कात्रड रस्त्यावर थांबले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. पाडळकर दुचाकीवरून कात्रडकडे निघाल्यावर लगेच त्यांच्या मागे दोघे निघाले. हल्लेखोरांची एक दुचाकी पुढे व एक मागे होती. गुंजाळे येथून अर्धा किलोमीटर गेल्यावर निर्मनुष्य रस्त्यावर चौघांनी त्यांना अडविले. धारदार शस्त्राने पाडळकर यांच्यावर वार करून हल्लेखोर पांढरीपुलाच्या दिशेने पसार झाले. 

रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या पाडळकर यांना गुंजाळे येथील ग्रामस्थांनी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले; परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करून त्यांना लगेच नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. 

गुंजाळे ग्रामस्थांकडून सत्कार 

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी सतीश पाडळकर यांनी तातडीने केले होते. त्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळाली. या चांगल्या कामाबद्दल गुंजाळे ग्रामस्थांनी आज पाडळकर यांचा सत्कार केला. सत्कार झाल्यावर परत जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. 

हल्लेखोरांची माहिती मिळाली नाही 

तलाठी सतीश पाडळकर यांच्या मांडीवर दोन, नाकाजवळ व डोक्‍यावर प्रत्येकी एक, असे चार वार झाले आहेत. डोक्‍याची जखम मोठी आहे. घटनास्थळी कोयता व लोखंडी रॉड सापडला. सध्या अतिदक्षता विभागात पाडळकर यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे हल्लेखोरांची माहिती मिळाली नाही. 
- दिलीप तुपे, पोलिस हेडकॉन्स्टेबल, वांबोरी पोलिस दूरक्षेत्र  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळ

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

SCROLL FOR NEXT