Assets acquired through corruption can be investigated ... 
पश्चिम महाराष्ट्र

भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेची चौकशी होऊ शकते...

शैलेश पेटकर

सांगली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहास आज प्रारंभ झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे आणि अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली. राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन झाले. शासकीय कर्मचाऱ्याने भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेविषयी नावानिशी किंवा निनावी अर्ज केला तरी चौकशी होऊ शकते. तक्रारीमध्ये स्थावर मालमत्तेबाबत स्पष्ट उल्लेख हवा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे. 

केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार हा सप्ताह होतोय. जिल्हाभर जनजागृती मोहीम होईल. भ्रषाचार विरोधातील कारवाईसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन होईल. सामाजिक संघटना, तालुका व गाव पातळीवरील नागरिकांना प्रबोधन केले जाईल. शहरातील प्रमुख चौकात भ्रष्टाचाराबाबत किंवा लाचखोरीबाबत तक्रार करण्याबाबतचे फलक लावले आहेत. 

उपाधीक्षक घाडगे म्हणाले, ""भ्रष्टाचार प्रतिबंध विभागामार्फत भ्रष्टाचारी लोकसेवकांविरुद्ध मालमत्तेची चौकशी, लाच घेताना सापळा लावून पकडणे, पदाचा दुरुपयोग केल्याबाबत चौकशी करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते. एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने घर, मोटारगाड्या, दुकाने, प्लॉट, शेतजमीन किंवा अन्य मालमत्ता भ्रष्टाचारातून मिळवली असेल त्याबाबत नावानिशी किंवा निनावी तक्रार करता येते. 

लाचेचा सापळा या प्रकारात तक्रारदार व्यक्तीने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा रचून संबंधितास रंगेहाथ पकडले जाते. शासकीय कर्मचाऱ्याने पदाचा दुरूपयोग करून शासकीय संपत्तीचा अपहार केला किंवा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला, इतरांना करू दिला तरी तक्रारीनंतर त्याची चौकशी करता येते.'' 

टोल फ्री क्रमांक... 
राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित मंडळे, संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदी विभागातील लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत ऍन्टी करप्शन ब्युरो, बदाम चौक, पोलिस लाईन शेजारी येथे दूरध्वनी क्रमांक (0233-2373095) अथवा टोल फ्री (1064), तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT