पश्चिम महाराष्ट्र

खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास मान्यता रद्द

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी प्रवेशासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र गर्ल्स हायस्कूलमध्ये बैठक झाली. श्री. चौगुले म्हणाले, "विना अनुदानित शाळांत दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के कोट्यानुसार प्रवेश दिला जातो. या कोट्यातील संख्या दरवर्षी वाढत आहे. काही शाळांचा त्याला विरोध असल्याचे दिसत असले तरी प्रवेश देणे बंधनकारक आहे. गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शी प्रवेश प्रक्रिया व्हावी. तसेच संस्था प्रतिनिधींनी गुणवत्तेवर प्रवेश द्यावेत. शिक्षक पालक कार्यकारिणी स्थापन करत सर्व सामान्य पालकांना परवडेल, असे शिक्षण शुल्क निश्चित करावे‌."

अकरावीचे प्रवेश आॅनलाईन झाले असून प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाधिकारी एस. के. यादव म्हणाले, "विनाअनुदानित खासगी शाळांना पत्रे पाठवली होती. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या शाळांवर कारवाई करणार आहोत. पालकांची लुबाडणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. शाळांकडे फि स्ट्रक्चरची मागणी केली आहे. बिल्डींग फंडसाठी सक्ती चालणार नाही. शाळा दाद देत नाहीत, त्यांना एक संधी देऊ. शिक्षण हे सेवेचे क्षेत्र असून नफेखोरीचे नाही, हे संस्था चालकांनी लक्षात घ्यावे. काही वेळेस व्हीआयपींची अडवणूक होते. त्यांना प्रवेश देण्यास सांगावे लागते."

समिती सदस्य रुपाराणी निकम म्हणाल्या, "शाळांना एक संधी कशासाठी द्यायची? दंडात्मक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. तो पैसा होतकरू विद्यार्थ्यांसाठी वापरु."

शिवसेनेचे युवा सेना अधिकारी चेतन शिंदे यांनी बैठकीस काही शाळांचे प्रतिनिधी गैरहजर असल्याकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी त्या शाळांचा निषेध केला. ते म्हणाले, "डोनेशनरुपी राक्षस पालकांच्या मानगुटीवर बसला आहे. दरवर्षी शिक्षण शुल्क वाढ होत असून, बिल्डींग फंडच्या नावाखाली पिळवणूक केली जात आहे. आमचा लढा गलथान कारभाराविरोधात आहे. हेकेखोरपणा चालू देणार नाही."

दीपक गौड यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी किशोर घाटगे, 
अविनाश कामते, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, अमर समर्थ, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, योगेश चौगले, प्रकाश पाटोळे, अक्षय पाटील, रुपाराणी निकम, प्राचार्य ए. एस. रामाणे उपस्थित होते.

बैठकीस ६९ शाळांपैकी २१ शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्था चालक प्रशासनाला जुमानत नसतील तर त्यांच्यावर कारवाई काय करणार, अशी विचारणा किशोर घाटगे यांनी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT