Astrology Prophecy in Ahmednagar About Corona Virus
Astrology Prophecy in Ahmednagar About Corona Virus 
पश्चिम महाराष्ट्र

Video : या महिन्यात भारत होईल कोरोनामुक्त..नगरच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

सकाळ वृत्तसेवा

नगर - कोरोना व्हायरसने बघता बघता हातपाय परसले आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाची झोप उडवली. चीनमधील बळींचा आकडा ऐकताना, टीव्हीवर तेथील बातम्या पाहताना आपल्याला त्याचं फारसं गांभीर्य नव्हतं. आपलं कोण आहे चीनला... तो व्हायरस कशाला मरायला आपल्याकडं येतोय, अशाच कसल्याशा भ्रमात होते. परंतु तो चीनची सीमा ओलांडून कधी मुंबई-पुण्यात आणि तेथून गाव खेड्यात शेतीच्या बांधावर कधी पोहोचला हे कळलंच नाही. त्यातच डब्ल्यूएचओने भारताला सावध राहण्याचा सल्ला दिल्यापासून सर्वांचीच पाचावर धारण बसली आहे.

जगबुडीच्या अफवा

आता तर कोणी जगबुडीच्या वावड्या उठवायला सुरूवात केली आहे. कोणी नॉस्ट्रेडेमसची भविष्यवाणी पुन्हा पुन्हा उगाळत आहे. कोणी देशी नुक्सा सांगून शेण खायला लावत आहे तर कोणी तपकीर ओढायला सांगत आहे. गाव सोडून शहरी भागात आलेल्यांनी तर केव्हाच मरणाच्या भीतीने गावाकडे पळ काढला आहे. जत्रा, यात्रा, लग्न समारंभासही गावात न दिसणारे गावात पडून आहेत.

डॉक्टर, पोलीस, प्रशासन आणि सरकार आपल्या परीने लोकांचा जीव वाचवण्यासाठी अरोरात्र झटत आहे. लॉकडाऊनचा आदेश झुगारून काही धटिंगण पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. दिवसेंदिवस बळी चालले आहेत. आपल्याकडील आरोग्य सेवेचा धांडोळा तज्ज्ञांकडून घेतला जात आहे. मधूनच कोरोनावर काही औषध सापडल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे सर्वांनाच मरणाची भीती वाटते आहे.

शहर आलंय गावात

पुण्या-मुंबईहून लोक आल्याने आदिवासी पाड्यातील लोक गावकुसाबाहेर गेले आहेत. सगळीकडे संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अशा स्थितीमध्ये नगरचे ज्योतिषी संतोष घोलप यांनी एक व्हिडिओ यूट्यूब अपलोड केला आहे. त्यांच्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

लष्कर बोलवावे लागेल

त्यांनी ज्योतिष सांगताना भारताची कुंडली मांडली आहे. त्यातील चंद्र आणि सूर्यांचे बलाबल याचाही विचार केला आहे. राहूचाही त्यांंनी अभ्यास केला आहे. लॉकडाऊनद्वारे सरकारने संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला. हेच महत्त्वाचे पाऊल आहे. लॉकडाऊन असला तरी काही लोकांकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काही भागात लष्कर बोलवावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या आणि राज्यांच्या सीमा सील केल्या जाऊ शकतात, असेही त्यांचे म्हणणे आहे.

काय म्हणतात ज्योतिषी 

संतोष घोलप यांनी ज्योतिष सांगताना चक्रीय अष्टक वर्ग या मेदनीय ज्योतिष पद्धतीचा अवलंब केला आहे. ते शक्यतो राजकीय ज्योतिष वर्तवित नाहीत. परंतु महाराष्ट्रात भाजपशिवाय सरकार बनणार, केंद्रात मोदींना किती जागा मिळतील, मध्य प्रदेश सरकारबाबतची भविष्यवाणी त्यांनी आपल्या फेसबुक पेजद्वारे वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली होती. ते ज्योतिष वर्तवित असले तरी ते विज्ञाननिष्ठ आहेत. उगाच वादग्रस्त विधान करून ते प्रसिद्धी मिळवणाऱ्यांमधीलही नाहीत. त्यामुळेच त्यांचे फेजबुकवर मोठे फॅन फॉलोअर्स आहेत.

या महिन्यात हे होईल

घोलप यांनी तेरा एप्रिलनंतर देशात कोरोनाबाबतची स्थिती सुधारण्यास सुरूवात होईल. पंधरा मेपर्यंत एकदम स्थिती निवळेल. कारण भारताच्या कुंडलीतील सूर्यच आपल्याला वाचविणार आहे. कारण या काळात तो प्रबळ होत आहे. त्यामुळे देशवासियांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. भविष्यातील स्थिती दिलासादायक असली तरी लोकांनी केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या लॉकडाऊनबाबतच्या आदेशाचे पालन करावे. दोन्ही सरकार चांगले काम करीत आहेत. जबाबदार नागरिक म्हणून लोकांनीही आपली कर्तव्य पार पाडावीत, असेही त्यांनी आपल्या संतोष घोलप या यू ट्यूब चॅनलवर सांगितलं आहे. 

तर मग अवघडय

ज्योतिष शास्त्राला विज्ञान म्हणून अद्यापि मान्यता मिळालेली नाही. काहीजण तर याला थोतांड मानतात. ज्योतिषशास्त्रावर किती विश्वास ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु घोलप यांनी केलेली भविष्यवाणी लोकांच्या मनातील भीती कमी करणारी आहे. त्यांच्या ज्योतिषामुळे जगबुडीच्या अफवांना आळा बसू शकतो. मात्र, याचा अर्थ लोकांनी उलटा घेत ''काही होत नाही... फिरा बाहेर'' असं केलं तर मग अवघड आहे! 

हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT