ATMs absconded with Rs 20 lakh 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांनी एटीएम पळविले

सकाळ वृत्तसेवा

राहाता : बॅंक ऑफ महाराष्ट्राचे बाभळेश्वर येथील शाखेचे "एटीएम' काल (शनिवारी) मध्यरात्रीनंतर साडेतीनच्या सुमारास चोरांनी पळवून नेले. "एटीएम'मध्ये 19 लाख 93 हजार 200 रुपये होते. 

येथे क्‍लिक करा पोलिसांची गस्त कोणीकडे? 

बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा व "एटीएम' आहे. काल मध्यरात्री चोरांनी "एटीएम'चा दरवाजा, तसेच अन्य साहित्याची मोडतोड करून आत प्रवेश केला. संपूर्ण "एटीएम'च बाहेर ओढत आणले; पण ते जड असल्यामुळे वाहनाद्वारे ओढून रस्त्याच्या पलीकडे नेल्याच्या खुणा येथे दिसतात. त्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. लोकांची चाहूल लागताच "एटीएम' वाहनाला लावून चोरांनी लोणीच्या दिशेने धूम ठोकली.

"एटीएम'चे बरेच सुटे भाग रस्त्याच्या कडेला पडले होते. बाभळेश्वर येथील काही तरुणांनी चोरांच्या वाहनांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु चोर वेगाने पसार झाले. 
दरम्यान, आजपर्यंत या ठिकाणी "एटीएम' फोडल्याच्या घटना दोनदा झाल्या आहेत. चोरी करण्यापूर्वी चोरांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. महाराष्ट्र बॅंकेचे "एटीएम' खासगी कंपनीद्वारे चालविले जाते. बॅंकेची सुरक्षा "राम भरोसे' आहे. रात्रीच्या वेळी येथे सुरक्षारक्षक नसतो. याबाबत लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT