Atpadi Panchayat Samiti Speaker's car got driver after two years 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी सभापतींच्या गाडीला दोन वर्षांनी मिळाला चालक; अधिकाऱ्यांनी काढला असा मार्ग

नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली)  : आटपाडी पंचायत समितीच्या सभापतींच्या गाडीला तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर चालक मिळाला. तोही गटविकास अधिकारी एम. आर. भोसले यांच्या गाडीवर नियुक्ती असलेला. तडजोड म्हणून सभापतींच्या गाडीसाठी हा चालक देण्यात आला आहे. 

आटपाडी पंचायत समितीत चालकाची चार पदे आहेत. दोन रिक्त आहेत. दोन वर्षापासून पंचायत समितीच्या सभापतींच्या गाडीला चालकाची अधिकृत नेमणूक झालेली नव्हती. दोन वर्षे सभापती गाडीला चालक देता का चालक? अशी विनंतीवजा साद जिल्हा प्रशासनाला घालण्यात येत होती. तरीही चालक काही मिळाला नाही. 11 महिन्यांपूर्वी विद्यमान सभापती भूमिका बेरगळ यांची निवड झाली. त्याअगोदर हर्षवर्धन देशमुख सभापती होते. ते स्वतःची गाडी वापरत. त्यांना अडचण आली नाही.

मात्र सभापती झाल्यापासून बेरगळ यांना चालक नसल्याने समस्या जाणवू लागली. त्यांच्या गाडीवरील चालकावर मेंदूच्या विकाराबद्दल शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते गाडी चालवत नव्हते. त्यामुळे सभापतींना शासकीय बैठका, कार्यक्रमांना वेळेत जाता येत नव्हते. चालक देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार केले. कंटाळून त्यांनी नादच सोडून दिला.

नूतन गटविकास अधिकारी एम. आर. भोसले यांनी लक्ष घातले. छोटे पाटबंधारे विभागाची गाडी दोन वर्षापासून उभी असल्याने तो चालक रिकामा होता. तो त्यांनी स्वतःच्या गाडीवर गेतला. त्यांच्या गाडीवरील चालक सभापतींच्या गाडीवर महिन्यापासून कामास पाठवला आहे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सभापतींच्या गाडीला चालक मिळाल्यामुळे त्यांना विविध ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या भेटी, कार्यक्रम आणि बैठकांना वेळेत पोहोचणे शक्‍य होऊ लागले आहे. 

अकरा महिने  गाडीवर चालक नव्हता

अकरा महिने पदाचा कार्यभार घेऊन झाले. पहिल्यापासूनच गाडीवर चालक नव्हता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनेक गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेक पत्रव्यवहार केले. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीवरील चालक सभापतींच्या गाडीसाठी दिला आहे. 
- भूमिका बेरगळ, सभापती, आटपाडी पंचायत समिती 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळळा

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

Unseasonal Rain: अवकाळीने पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना अश्रू अनावर; सोनई-लोहगाव रस्त्यावरील झाडे पडली, कांदा भिजला!

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT