crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत जुही चावलाच्या पतीवर खुनी हल्ला...

सकाळवृत्तसेवा

मिरज- येथील पाण्याच्या टाकीजवळील ईदगाह माळावर राहणाऱ्या दोन कुटुंबात पूर्ववैमनस्यातून चाकू घेऊन हाणामारी झाली. खुनी हल्ल्यात प्रविण ऊर्फ पल्या काळे (रा. ईदगाह माळ) हा जखमी झाला असून त्याची पत्नी सौ. जुही चावला प्रविण ऊर्फ पल्या काळे (वय 25) हीने मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर जुही चावला हिच्या पतीविरूद्ध सौ. आंबडेला अंबर पवार (वय 25, संजय गांधीनगर झोपडपट्टी मिरज) हीने फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरजेतील पाण्याच्या टाकीजवळील ईदगाह माळावर पारधी समाजातील सौ. जुही चावला प्रविण काळे ही पती प्रविणसह राहते. शेजारीच राहणाऱ्या पारधी समाजातीलच आंबर लवलक पवार (रा. ईदगाह माळ) याच्याशी त्यांचा वाद आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा जुही चावला आणि पती प्रविण झोपडीत बसले होते. तेव्हा आंबर आणि पत्नी आंबडेला त्यांच्या झोपडीसमोर आले. दोघांनी जुही आणि पती प्रविणला "तुम्ही झोपडी खाली का करून गेला नाही. तुम्ही या ठिकाणी राहायचे नाही. तसेच आमच्याबरोबर चिंचा गोळा करण्यासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी यायचे नाही' असे ठणकावून सांगितले. त्यावरून वाद सुरू झाला. आंबरने तेव्हा शिवीगाळ करून चाकू बाहेर काढून जुहीचा पती प्रविणच्या खांद्यावर आणि छातीवर वार केला. हल्ल्यात प्रविण गंभीर झाला. याप्रकरणी जुही हीने फिर्याद दिली असून आंबरविरूद्ध खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
दरम्यान संशयित हल्लेखोर अंबर याची पत्नी आंबडेला पवार हीने देखील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, प्रविण आणि पत्नी जुही हे दोघेजण सारखे चोरीचे गुन्हे करतात. त्यामुळे त्यांना झोपडी सोडून जावा. तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होतो असे सांगितले होते. त्याचा राग मनात धरून प्रविण याने अंबर व आंबडेला घरात असताना झोपडीसमोर येऊन शिवीगाळ केली. तसेच पाळलेल्या शेळ्यांवर चाकूने वार केला. त्यामुळे त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असताना प्रविणने आंबडेला हिला "तुला जीवंत सोडत नाही' असे म्हणून गळ्यावर आणि डाव्या कानावर चाकूने वार करून जखमी केले. 
दोन कुटुंबातील हाणामारीनंतर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध खुनी हल्ल्या केल्याचा परस्परविरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे नवे आरोप, कोण आहेत श्वेता सिंह?

Love Marriage Tragedy : चौदा वर्षांपूर्वी प्रेमविवाह, ४ वर्षांपूर्वी सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; परिणिती, शिवम झाले पोरके, प्रेमाचा भयानक शेवट

Nagpur Accident: नागपूरमध्ये कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, मैदान गाजवलं पण रस्त्यावर हरले; दोघांचा अंत, युवती जखमी!

नागपुरात १२वीच्या विद्यार्थीनीनं संपवलं जीवन, फिजिक्सचा पेपर देऊन घरी आली अन्...

Nashik News : एजंटशाही अन् सरकारी दिरंगाईला कंटाळले उद्योजक; 'मैत्री' पोर्टल सुरू करण्याची नाशिकमध्ये मागणी

SCROLL FOR NEXT