attack on vehicle of shiv sena belgaum district head from kannada organisation in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

Video ब्रेकिंग : शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भ्याड हल्ला; बेळगावात तणाव

मिलिंद देसाई

बेळगाव : शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आहे. तसेच शिवसेना फलक आणि वाहनाला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लाल पिवळा ध्वज लावण्यात आल्यापासून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध कारणांनी शहरांत दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात मराठीसह कन्नड, इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आले आहेत. मात्र मराठीची कावीळ झालेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली. तसेच मराठी फलकांना काळे फासले जात आहे. त्यामुळे गुरुवारपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज (शुक्रवारी) दुपारी खडे बाजार पोलिस स्थानकातून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरोळकर यांना शिवसेनेची रुग्णवाहिका बाजूला लावा असे सांगण्यात आले. त्यामुळे शिरोळकर, प्रवीण तेजम रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयाजवळ जात असताना पोलिस बंदोबस्तात आलेल्या 10 ते 15 जणांनी वाहन अडवीत शिवसेचा फलक काढून टाकला. त्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला.

अचानकपणे कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने, परिसरात काही काळासाठी गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली होती. मात्र मराठी भाषिक जमेपर्यंत कन्नड कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला. घटना माहिती असूनही पोलिसांनी बघ्याची भूमीका घेतली. या घटनेमुळे पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शिवसेना कार्यालयाजवळ मराठी भाषिक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. 

पाहा व्हिडिओ - 

>

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT