Attempt of Shivsainiks to enter Karnataka agitation in belgaum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

शिवसैनिकांचा कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न ; प्रवेश बंदी निवेदनाची केली होळी

अनिल पाटील

कोगनोळी : बेळगाव महानगरपालिकेवर लाल पिवळा झेंडा फडकविण्यात आला आहे. तो झेंडा काढून भगवा झेंडा लावण्यात यावा, महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना कर्नाटकात घातलेली बंदी निंदनीय आहे. त्यामुळे शिवसैनिक कर्नाटकात प्रवेश करणारच, या उद्देशाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सोमवारी (ता. ८) येथील दुधगंगा नदीजवळ असणाऱ्या कर्नाटक हद्दीत जाण्याचा जोरदार प्रयत्न केला.हा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांनी हाणून पाडून शिवसैनिकांना ताब्यात घेऊन परत महाराष्ट्रात नेले.


यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 'कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी केली आहे. ही निंदनीय गोष्ट असून कर्नाटक शासनाचा आपण निषेध करत आहोत. बेळगाव महानगरपालिकेवर फडकवण्यात आलेला लाल पिवळा झेंडा उतरून त्याजागी भगवा झेंडा फडकविण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. शासनाने केलेल्या बंदीचा निषेध करून आम्ही कर्नाटकात प्रवेश करणार आहोत.

'सकाळी नऊ वाजता कागल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिक जमले. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी मोटार सायकल रॅली काढून ते दूधगंगा नदीवर आले.या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी अडविले. यावेळी कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,' 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', यासह अन्य घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.यावेळी कर्नाटक शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेश बंदीचा देण्यात आलेल्या आदेशाची होळी करण्यात आली.यानंतर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या या शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सुजित चव्हाण, विभाग प्रमुख वैभव अडके,  कागल तालुका प्रमुख शिवगोंडा पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.यावेळी निपाणी मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार, एएसआय एस. ए. टोलगी, पी. एम. घस्ती, अमर चंदनशिव यांच्यासह कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, एपीआय दीपक वाकचौरे, निरीक्षक सुशांत चव्हाण, निखिल कर्चे,  उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांच्यासह शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT