Attendance of students coming to school will be less 
पश्चिम महाराष्ट्र

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी भरणार

दिलीप क्षीरसागर

कामेरी : वाळवा तालुक्‍यात माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. मात्र या शाळांसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाकडून सवलतीचे व मोफत पास सेवा नसल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी भरणार आहे. 

वाळवा तालुक्‍यातून या शाळेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांच्या बरोबर परगावहून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. हे सर्व विद्यार्थी एसटी बसने येत असतात. यामध्ये या विद्यार्थ्यांना एसटी बसने ये -जा करण्यासाठी काही सवलत देण्यात येते. यामध्ये 33 टक्के विद्यार्थी व 66 टक्के शासन पैसे भरून विद्यार्थ्याला पास दिला जातो तर आईल्याबाई होळकर योजनेअंतर्गत पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास दिला जातो. 

अशा विद्यार्थी इस्लामपूर स्थानकासह अंतर्गत येणाऱ्या आष्टा ,कासेगाव यामध्ये साधारण 12 हजारावर विद्यार्थी आहेत. त्यातच एसटी महामंडळाच्या ग्रामीण भागात एसटी बसच्या फेऱ्या अजून फारशा सुरू नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत येणार कसे हाही प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमी बसेस कमी प्रमाणात सुरू आहेत. मात्र आता जर शाळांनी शाळा सुरु करणे बाबतचा शासनाचा आदेश व शाळेचे पत्र एस .टी. महामंडळ दिले. तर आम्ही विद्यार्थ्यांना पासही देऊ व एसटी फेऱ्या सुरू करू. 
- एस. ए. देसाई, बस आगार प्रमुख इस्लामपूर

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT