Swabhimani Farmers organisation  
पश्चिम महाराष्ट्र

नाराज स्वाभिमानी संघटनेच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष | Election Results 2019

गणेश शिंदे

जयसिंगपूर - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारले. यामुळे नाराजीनाट्याला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनाच जर संघटना नको असेल तर तर आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा पवित्रा काहींनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या ऊस हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर ऊस दरासाठी दरवर्षी आयोजित ऊस परिषदेवरही अनिश्‍चिततेचे सावट आहे. कदाचित ऊस परिषद घेऊन संघटना आपली भूमिका जाहीर करु शकते. शिरोळ विधानसभेतील पराभावानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 

लोकसभा निवडणूकीत नवखे उमेदवार धैर्यशिल माने यांच्याकडून पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विधानसभेचा उतारा अपेक्षित होता. यासाठी माजी खासदार शेट्टी यांनी शिरोळ तालुक्‍यातील गावागावात तळ ठोकून उमेदवार सावकर मादनाईक विजयासाठी कंबर कसली होती. मात्र, विधानसभेलाही पुन्हा स्वाभिमानी चळवळीच्या मुशीतून घडलेल्या आमदार उल्हास पाटील यांना मतदारांनी साथ दिल्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. 

"चळवळ टिकली पाहिजे' हि टॅगलाईन घेऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. श्री मादनाईक यांच्यापेक्षाही चळवळीचा मुद्दा पुढे करुन स्वाभिमानीने प्रचार केला. मात्र, याचाही प्रभाव मतदानात दिसला नाही. मतदानानंतर विजय मिळाला नाही तर चळवळ थांबवावी का याचाही विचार झाला. यामध्येही दोन मतप्रवाह सुरु आहेत. यंदाच्या ऊस दराच्या मागणीसाठी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत याबाबतची नेमकी दिशा स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. शिरोळ तालुक्‍यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार झाला. 

तालुक्‍यातील ऊस दराची आंदोलने राज्यभर गाजली. ऊस आणि दूध दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गल्लीपासून दिल्लीपर्यंतची झेप घेतली. आमदार उल्हास पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी संघटनेची साथ सोडल्यानंतर तसेच अन्य कारणांमुळे संघटनेपुढे अनेक संकटे निर्माण झाली. भाजपशी साथ नंतरच्या काळात विरोध यानंतर कारखानदारांशी मनोमिलन आदी घडामोडी शेतकऱ्यांना रुजल्या नाहीत. याचा परिपाक लोकसभा निवडणूकीतून दिसून आला. विधानसभेच्या आशा असतानाही याठिकाणीही पदरी निराशाच आल्याने चळवळीपुढे आता पुढे काय करायचे हा यक्षप्रश्‍न उभा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : दिल्लीत लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्रालयाने तातडीने बैठक बोलावली

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Dharmendra News: पाच वर्षे खासदार राहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण का सोडले? पडद्यामागं काय घडलं होतं? जाणून घ्या खरं कारण...

धर्मेंद्र यांना दाखल केलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च किती येतो? एका रूमसाठी घेतलं जातं इतकं बिल

SCROLL FOR NEXT