Attention to the role of Congress leaders on the issue of honor in karhad on the occasion of loksabha election
Attention to the role of Congress leaders on the issue of honor in karhad on the occasion of loksabha election  
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सन्मानाच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांच्या भुमिकेकडे लक्ष

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
कऱ्हाड : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, त्यांना बरोबर घेवून चालले पाहिजे, असा सन्मानाचा मुद्दा पुढे करून काँग्रेसच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणेत पडलेली वादाची ठिणगी जिल्हाभर पसरत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमपणाला धार असली तरी काँग्रेसच्या नेते त्यावर नेमकी काय भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे. अनेक वर्षापासून वारंवार काँग्रेसच्या नेत्यांना पेचात धरणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी पेचात धरण्याचा केलेला प्रयत्न यानिमित्ताने झाल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. त्याला राष्ट्रवादी नेमके काय उत्तर देणार याकडेही लक्ष लागून आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांच्यासाठी बांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी धर्म पाळण्यासाठी कऱ्हाडला जिल्हा काँग्रेस समितीची बैठकही झाली आहे. त्यावेळी बैठकीत राष्ट्रवादीवर नाराजीचा सूर उमटला होता. सन्मान मिळाला पाहिजे, असाच मुद्दा पुढे करत काँग्रेसच्या नेत्यांनी आग्रह धरला होता. त्याच मुद्दांवर पुन्हा कालपासून काँग्रेसतंर्गत वातावरण तापले आहे. त्यासाठी त्याच मुद्यावर कऱ्हाड तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक वडगाव हवेली येथे पार पडली. त्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते बंडानाना उर्फ जयवंत जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, विद्यार्थी काँग्रेसचे नेते शिवराज मोरे, नितीन थोरात, वैभव थोरात, नामदेव पाटील, शंकरराव खबाले, श्री. गलांडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. अत्यंत तीव्र शब्दात नेत्यांनी भूमिका मांडल्या.

काँग्रेसचे नेते आघाडी धर्म निश्चित पाळणार आहेत. प्रचाराला कोणीही विरोध करण्याच्या मानसिकतेत नाहीत. मात्र खासदार उदयनराजे यांना मानणाऱ्या गटाचे स्थानिक नेते सातत्याने काँग्रेस विरोधी भुमिका घेत आहेत. ते थांबले पाहिजे, असा आग्रह धरण्याचा कालच्या बैठकीत निर्णय झाला आहे. निधीबाबतही अनेकदा अफवा उठविल्या जातात. त्याबाबत आता कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून ती दास्तान पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. 

कऱ्हाड पंचायत समिती, कऱ्हाड पालिकेसह मलकापूरच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांच्या गटाने काँग्रेस विरोधात भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा तोटा काँग्रेसला झाला आहे. अशी स्थिती असताना पुन्हा त्यांनी काँग्रेसला गृहीत धरून सुरू केलेली वाटचाल योग्य नाही, असाही सुर त्यातून पुढे आला आहे. कऱ्हाडसह मलकापूरातही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली फारकत येथे महत्वाची आहे. त्या सगळ्याच गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या गटाने पुढे आणल्या आहेत. त्यामुळे त्यावर नेत्यांची भूमिका काय राहणार यासह मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीची त्यावर नेमकी काय भूमिका असणार याकडेही लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT