The attraction of 3D panati for Dipotsava 
पश्चिम महाराष्ट्र

आली दिवाळी : दीपोत्सवासाठी थ्रीडी पणत्यांचे आकर्षण 

घनशाम नवाथे

सांगली : दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सह...घरोघरी पणत्या पेटवून अंगण उजळून टाकले जाते. गेल्या काही वर्षांपासून विद्युत पणत्या बाजारात आल्या आहेत. त्याचबरोबर आता थ्रीडी पणत्यांनी आकर्षण निर्माण केले आहे. बहुरंगी परावर्तीत थ्रीडी पणत्यामुळे वेगवेगळ्या रंगाची उधळण अंगणात करता येते. 

गेली कित्येक वर्षे पारंपरिक मातीच्या पणत्यांनी दीपोत्सव साजरा केला जात होता. दिवाळी झाली की पणत्या धुवून पुसून ठेवल्या जात. परंतु अलीकडच्या काळात बदल होत; मातीच्याच परंतु विविध आकार दिलेल्या रंगीत पणत्या बाजारात आल्या आहेत. त्यालाही मागणी वाढत आहे.

त्याचबरोबर लटकत ठेवायच्या पणत्याही बाजारात आहेत. मातीच्या पणत्या वाऱ्याच्या झोतामुळे मालवतात. त्यामुळे प्रत्येकवेळी त्या पुन्हा प्रज्वलित कराव्या लागतात. याला पर्याय म्हणून विद्युत पणत्या आल्या आहेत. वातीची पणती पेटवल्याप्रमाणे त्या झगमगाट करतात. 

एकूणच पणत्यांची मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये आकर्षकपणा आणण्यासाठी बहुरंगी परावर्तीत थ्रीडी पणत्या बाजारात आल्या आहेत. विविध रंगांच्या या पणत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या रंगाची पणती असते त्याच रंगाच्या डिझाईनमध्ये सावली पडून जमीन उजळून निघते. एकमेकाशेजारी विविध रंगाच्या पणत्या पेटवून ठेवल्यास, त्याप्रमाणे जमिनीवर रंगांची उधळण पाहता येते. एकाच रंगापेक्षा विविध रंगांची उधळण जमिनीवर करून दीपोत्सव साजरा करण्यासाठी या थ्रीडी पणत्यांना मागणी वाढत आहे.

सध्या बाजारात 12 पणत्या, 12 कापूस वाती आणि 12 होल्डरचा बॉक्‍स शंभर रुपयाला मिळतो. शिवाय दिवाळीनंतर या पणत्या स्वच्छ पुसून पुढील वर्षी वापरता येतात. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT