Author Jai Goyal Symbolic Statue Combustion In Kolhapur Marthi News
Author Jai Goyal Symbolic Statue Combustion In Kolhapur Marthi News 
पश्चिम महाराष्ट्र

रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याबद्दल लेखक जय गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे युवक काँग्रेसतर्फे बिंदू चौकात आज दहन करण्यात आले. रायगडावर येऊन मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


जय गोयल लिखित पुस्तकात मोदी यांची शिवरायांबरोबर तुलना केली आहे. त्याचे पडसाद शिवप्रेमींत उमटले असून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून युवक काँग्रेसतर्फे भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा आज प्रयत्न होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयासमोर जाण्यास रोखल्याने त्यांनी बिंदू चौकात धाव घेतली. 

....अन्यथा आंदोलन सुरूच
मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला. भाजप सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय, तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोदी यांनी रायगडावर येऊन शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात यांनी दिला.

हेही वाचा- घरातील भांडणावरून बाहेर पडली आणि तीने केले हे कृत्य...
निदर्शनात स्वप्नील सावंत सचिन रावल उदय पवार वैभव देसाई मकरंद कवठेकर, आनंदा करपे, अक्षय शेळके, अॅड. कल्याणी माणगावे, दस्तगीर शेख, मोहसीन शेख, वैभव पाटील, अजिंक्य पाटील, राहित गाडीवड्डर यांचा समावेश होता. 
‌‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT